Hindi, asked by suryanshasati, 1 year ago

nibandh on Bharat ki sanskriti

Answers

Answered by prachi4652
12
संस्कृती या शब्दामध्ये सम् + कृ असे दोन संस्कृत धातू आहेत. याचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.

भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृतीदरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतींदरम्यान झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.

भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. देशातील विविधरंगी धार्मिक उत्सव, संगीत, नृत्ये, स्थापत्यशैली यातील कलात्मक बंध, तशीच भौगोलिक रचना आणि इथला पुरातन व आधुनिक संस्कृतींचा मिलाप ह्या गोष्टी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करत.

आशय

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो.संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]

वैशिष्ट्ये

भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची वाटचाल पाहिला असता तिच्यात प्रमुख तीन वैशिष्ट्ये दिसून येतात- १.अखंडित परंपरा

२.राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव

३.संस्कृतिसंघर्ष टाळून संस्कृतिसंगम करण्याची प्रवृत्ती.

ज्ञानाची उपासना

संपादन करा

भारतीय संस्कृतीचा पाया "वेद" हा मानला जातो.वेद म्हणजे ज्ञान.ज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारित अशी ही संस्कृती आहे.

संस्कृतीचे अन्य विषय

संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.- १.ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.

२.आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.

३.पुरुषार्थ- धर्म,अर्थ,काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्व आहे.

४.चातुर्वर्ण्य-ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .

धर्म

मैत्रेय बुद्धांच्या एका पुतळ्याचे,भारताच्या लदाखराज्यात थिकसे मठानजिकचे दृष्य.

मुख्य पाने: भारतातील धर्म व भारतीय धर्म

भारत हे हिंदू, बौद्ध, जैन व शीख या धर्मांचे जन्मस्थान आहे.आज हिंदू धर्म व बौद्ध धर्म हे जगातील अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे धर्म असून या दोन्ही धर्मांचे एकत्रित सुमारे २ अब्जांवर अनुयायी आहेत.दुसऱ्या अनुमानानुसार बौद्ध धर्म व हिंदू धर्म हे जगातील अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमाकांचे धर्म असून या धर्मांची एकत्रित लोकसंख्या ही २.६ ते २.९ अब्ज आहे. काही अत्यंत गहन आध्यात्मिक समूह आणि संस्कृती आहेत अशा धार्मिक बाबतीत अत्यंत वैविध्यशील असणाऱ्या जगातील देशांपैकी भारत एक आहे. देशात बहुसंख्य लोकांच्या जीवनात धर्माची मध्यवर्ती व निश्चित अशी भूमिका आजही आहे. भारतात सुमारे ७९% लोकांचा धर्म हा हिंदू आहे आणि सुमारे १४% लोक इस्लाम धर्मीय आहेत. तसेच भारतात ०.७% ते ६% बौद्ध धर्मीय, २.३% ख्रिश्चन धर्मीय, १.७% शीख धर्मीय व ०.४% जैन धर्मीयआहेत. विशेषतः भारतात ६% असलेला बौद्ध धर्म जगभरात प्रभावशाली आहे. पारशी धर्म, ज्यू धर्म आणि बहाई या धर्माचेही भारतात अनुयायी आहेत पण या धर्मीयांची संख्या कमी आहे. भारतात सुमारे २६% (३१ कोटी) लोक हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत. भारतीय जीवनप्रवाहात धर्मांची भूमिका प्रबळ असली तरी सहिष्णुतेसह बाळगलेला निरीश्वरवादी किंवा ईश्वराविषयी अनास्था असलेले नास्तिक आणि निधर्मी लोक ३० लाखापेक्षा अधिक भारतात आहेत.

धर्मात दोन भाग असतात.धर्मातील "यम" नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. यम म्हणजे तीनही त्रिकाळ न बदलणारा भाग.सत्य,प्रेम,अहिंसा,दया,परोपकार,ब्रह्मचर्य यांना यम असे म्हटले जाते. नियम म्हणजे जानवे घालणे,गंध लावणे इ. विद्वतरत्न के.ल दप्तरी यांनी म्हटले आहे की त्या त्या युगात नवधर्म त्या त्या युगातील विचारवंत देत असतात.

suryanshasati: I want to get in hindi
Answered by AashifHussain
3

Hey look here your answer.

Ans: भारतीय संस्कृति विश्व की सर्वाधिक प्राचीन एवं समृद्धि संस्कृति है

इससे विश्व की सभी संस्कृतियों की जननी माना जाता है जीने की कला हो या विज्ञान और राजनीतिक क्षेत्र ,

भारतीय संस्कृति का सदैव विशेष स्थान रहा है

अन्य देशों की संस्कृतियों तो समय की धारा के साथ-साथ नष्ट होती रही है किंतु भारत की संस्कृति आदि काल से ही अपने परंपरागत अस्तित्व के साथ अजर-अमर बनी हुई है

Similar questions