History, asked by chetan8021, 9 months ago

nibandh on maji aagi in marathi​

Answers

Answered by himanshukharpade5
3

Answer:

आईबाबा नोकरी करत असल्यामुळे घरातील सर्व काम सांभाळून माझ्यासारख्या हट्टी मुलीला सांभाळणारी माझी आजी माझ्यासाठी सुपरवुमन!

'सांभाळणारी' असं म्हणणं जरा कमीच होईल. माझा प्रत्येक शब्द तिने झेलला. माझ्या आईचा एखाद्या गोष्टीला विरोध असताना तिनेच मला सतत साथ दिली. दररोज वेगवेगळे पंचपक्वान्न करून मला जेवायला भरवणारी, केसातील गुंता काढून वेण्या बांधून देणारी, शाळेतल्या तक्रारी आईवडिलांपर्यंत पोहचू न देणारी... माझी आजी माझ्यासाठी खरंच मोठी आहे.

माझा शाळेचा गणवेशही तीच धुवायची. मी आजारी पडल्यावर माझ्यासाठी जागरणं करणारीही तीच. सोसायटीतील मुलांच्या पालकांच्या तक्रारी माझ्यासाठी झगडून मिटवणारी, उन्हाळ्याच्या सुट्टीत खास माझ्यासाठी कैरीचं लोणचं करणारी, दिवेलागणीच्या वेळी श्लोक आणि स्तोत्र म्हणून घेणारी माझी आजी. माझ्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून मला कथा-कीर्तनाला घेऊन जायची.

आईबाबा आपापल्या कामधंद्यात व्यग्र असल्याने माझ्याशी गप्पा मारून माझं मन जाणून घेतलं ते तिनेच. आम्ही मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये, यासाठी वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन, सल्ले देण्याची जबाबदारीही तिनेच पार पाडली.

एका विषयात नापास झाले होते. त्यामुळे 'अभ्यास नाही जमत तर कामधंदा करून चार पैसे कमवा,' हे आईचे टोमणे रोज ऐकावे लागायचे. तेव्हा मला वाईट वाटू नये म्हणून शिताफीने विषय बदलून मला सांभाळून घेण्याचं कामही तिनेच केलं. पण, या वयात सगळ्यात अधिक गरज असताना ती मला मागे सोडून गेली.

असं म्हणतात ना, 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री' असते तसंच मला घडवणारी, माझ्या कायम स्मरणात राहणारी अशी माझी आजीच!

Similar questions