India Languages, asked by jashmevada, 8 months ago

nibandh on mazi aaji

Answers

Answered by Anonymous
12
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावाकडे राहणा-या आजीची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात आजीने माझे म्हणजे नातवाचे पुरवलेले लाड, गावात असणा-या लोकांची मदत आजी कश्‍याप्रकारे करते हे  तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.


माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच! - आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.

आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःची सर्व कामे  आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. आजी दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे




hope its helps

Answered by vasudevshastri37
4

Answer:

माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या लवकर उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.

माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही. याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल ! 

आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच, वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.

एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच. ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.

Similar questions