nibandh on vachanache mahatva in Marathi
Answers
सध्या दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या आहेत.यावर वेळोवेळी अगदी दर तासाला ही बातम्या दिल्या जातात. तरीपण वृत्तपत्राचा खप कमी झाला नाही. यावरून लक्षात येते की, बातम्या कितीही ऐकली तरी बसल्याशिवाय माणसाचे समाधान होत नाही. दरवर्षी महाराष्ट्रात शेकडोंनी दिवाळी अंक निघतात. दरवर्षी त्यांची संख्या वाढतच असते. दुर्गा पूजेच्या निमित्ताने कोलकत्यात मोठे पुस्तक प्रदर्शन भरते आणि कोट्यावधी पुस्तकांची विक्री होते. या गोष्टी सांगतात की' वाचनाचा छंद' नाहीतर झालेला नाही.
वाचनाची सवय आपल्या लहानपणी लागते. तिची आवड कधी होते व नंतर आवड छंद कधी रूपांतरित होते ते आपल्याला कळत नाही. माझा आवडता छंद वाचन हाच आहे.
वाचन ज्याप्रमाणे ज्ञानात भर घालते त्याचप्रमाणे मनोरंजनही करते. कंटाळवाणा प्रवास, रिकामा वेळ आपण वाचनाच्या छंदामुळे सुसह्य करू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांना, देशात सेवकांना दीर्घ कारावास सहन करावा लागला. तेथे वाचनाचा छंद त्यांना फार उपयोगी पडला. उत्तम पुस्तक वाचतांना वर्तमानातील सर्व चिंता, काळजी यांचा विसर पडतो. उत्तम ग्रंथाच्या वाचनाने विलक्षण आनंद मिळतो, मनाला प्रसन्नता लागते. खूपचं करणारी व्यक्ती भविष्य होते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्तर विकास होतो.
आज जगात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्तींनी आपल्या वाचनात या छंदाचा गौरवाने उल्लेख केला आहे. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद इत्यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा विलक्षण छंद होता. ते गमतीने म्हणत की," माझ्या मृत्युनंतर माझ्यावर ग्रंथाच्या दुकानदाराचे देणे राहील." उत्कृष्ट ग्रंथाचा अनमोल ठेवा आणि ' वाचाल तर वाचाल' असा अनमोल संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला देऊन गेले. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती स्मरणशक्ती दांडगी होती एकदा वाचलेली गोष्ट ते कधीच विसरायचे नाहीत त्यांनासुद्धा भाषणांचा विलक्षण छंद होता. एकदा तर ग्रंथपाल सुद्धा त्यांना म्हणाला की तुम्ही पुस्तके वाचता की नुसतं पाने चाळता कारण एक महिना कालावधीच्या पुस्तकांना लागायचा हे स्वामीजी तीन दिवसातच वाचून काढायचे आणि तेही पान नंबर सहीत त्यांच्या स्मरणात राहायचे याचा अनुभव आणि प्रत्यय त्या ग्रंथपालाने जेव्हा स्वामीजींना प्रश्न विचारले तेव्हा आला आणि तो चकित झाला तर असा वाचनाचा महिमा आघात आहे.
वाचनाचा छंद असणारी व्यक्ती इतरांना त्रासदायक होत नाही. अगदी वरच्या काळातही वाचनाचा छंद असलेल्या वृद्ध इतरांना पीडित नाही. उलट तो सर्वांना मार्गदर्शक ठरतो. नातवंडे वाचनात रमलेल्या आपल्या आजोबांना आपल्या शंका विचारू शकतात. वाचनाने बुद्धीला स्थिरता येते. कित्येक चरित्रग्रंथ आपल्या अडचणीवर मात करण्याची प्रेरणा देतात. एखाद्या ललित ग्रंथात आपल्याला आपले चित्रण आढळते. ऐतिहासिक ग्रंथ आपल्याला भूतकाळात फिरून. तर भौगोलिक साऱ्या विश्वाचा आपल्याला परिचय होतो. अध्यातमिक ग्रंथ वाचल्याने म्हणाला असामान्य उभारी येते, उत्कृष्ट काव्य आपली रसिकता जिवंत ठेवतात. कवी, लेखक, साहित्यिक यांच्या नजरेतून आपण जगाचे नवे दर्शन घेऊ शकतो.
please mark as brainliest answer❣️☺️