Nibandha on ‘माझे आजोबा’ in marathi
Answers
Answer:
माझे आजोबा
माझे आजोबा चैतन्यपुर्ण असलेले मनाने प्रसन्न असणारे हास्य विनोद करत वावरतात .यामुळे सगळ्यांना त्यांचा सहवास आवडतो. माझे आजोबा धार्मिक प्रवृत्ति चे होते . त्यांचा दिनक्रम पहाटे तीन वाजे पासून आरंभ व्हायचा .
पहाटे चार वाजता पुर्ण गावात प्रभातफेरीला जातात . हा त्यांचा नित्य नियम आहे .कार्तिक महिन्यात मंदिरात काकडा आरती होते . पहाटे पाच सहा कृष्ण मंदिरात नचुकता जातात . घरी आल्यावर देवपुजा, पारायण ,जपमाळा करायचं . ज्ञानेश्वरी ग्रंथ नित्य नियमानुसार वाचतात . नंतर चहा नाश्ता करायचं . मंदिरातील आवार पुर्ण स्वच्छ ठेवतात . बरे नसतांनाही त्यांच्या दिनक्रमात बदल होत नसतो.
दररोज शेतात जायचे खुप काबाड कष्ट करायचे . शेतात गेले की,शेतातून मक्याच कणिस ,मुगाच्या शेंगा ,बोरं ,भेंडीची भाजी ,पाले भाज्या , टोमॅटो ,काकडी ,टरबूज असे बरेच काही आणायचे . घरातील शेतातील सर्व जबाबदारीने पार पाडत . ते शेतात चार माणसांची काम एकट्याने करत असत . थकून आल्यावर आराम करतात . परंतु त्यांचे वय वाढत असल्याने ते देखरेख करतात . पाऊस केव्हाही पडला की ,ते स्वतः पायी शेतात जातात . आणि शेता ची अवस्था कशी आहे ते बघतात . त्यांचा हा एक नियम होता.
वाढत्या वयामुळे ते त्यांच्या मित्रात वेळ घलवतात . सकाळी अणि संध्याकाळी मंदिराच्या आवारात मित्रांसोबत वर्तमान पत्र वाचत ,गप्पा गोष्टी करायचं . त्यांची जेवणाची वेळ सकाळी १० तर संध्याकाळी ६ किंवा सकाळी अकरा तर संध्याकाळी सात असते . जेवणाची वेळ काटेकोर पणे पाळतात .
दररोज रात्री झोपण्या आधी आम्हाला गोष्ट सांगतात. आमच्या शी गप्पा मारतात . मी लहान असतांना मला सदैव मंदिरात खेळवत . सकाळी संध्याकाळी मी पटकन तयारी करुन आजोबांसोबत जायची . मी शाळेत जायला लागले आणि माझे खेळायला जाणे कमी झाले .