India Languages, asked by chinki36, 1 month ago

nibandha on Swami Vivekananda ek vicharvanta in konkani​

Answers

Answered by rahimakaniz48
0

Answer:

नमस्कार मित्रांनो आज आम्ही भारतातील एक महान थोर पुरुष ज्यांनी भारतीय संस्कृतीला जगप्रसिद्ध केले म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्यावर मराठी निबंध आणला आहे. स्वामी विवेकानंद या मराठी निबंध मध्ये आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचे वर्णन केले आहे. तर चला निबंध सुरू करूया.

Swami Vivekananda Marathi essay

स्वामी विवेकानंद.

नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुनेश्वरीदेवी असे होते. स्वामी विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे "संस्कृत" व "परीक्षण' भाषेचे एक विद्वान होते.

नरेंद्रनाथ यांच्‍यावर लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तिभावा चा प्रभाव होता, कारण त्यांचे आई त्यांना ह्या गोष्टी सांगत असे. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते शाळेत सुद्धा सर्वात हुशार विद्यार्थी होते. फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात हि तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ते भाग घेत असे.

स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण, महाभारत, भगवत गीता, वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते. स्वामी विवेकानंदांनी १८८४ ला आपले शिक्षण पूर्ण करून "आर्ट्स" चे डिग्री मिळाली होती त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला होता.

रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद ह्यांना घडवले होते आणि त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले होते. स्वामी विवेकानंद धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून खूप दुःख होत असे. भारतीय समाज सर्व समर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे.

स्वामी विवेकानंद ह्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार पूर्ण जगभर पसरवण्याचे काम केले होते. अमेरिके मध्ये शिकागो येथे १८९३ मध्ये सर्वधर्मपरिषद झाली होती. तिथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. तिथे स्वामी विवेकानंदांचे भाषण एकूण सर्व लोक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्या ह्या भाषणामुळे हिंदुधर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगाला झाला होता आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंद ही विश्व प्रसिद्ध झाले.

अमेरिके वरून परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला आणि आपले विचार लोकांना सांगायला सुरु केले. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले.

असा हा महापुरुष १९०२ साली आपल्या देशाला सोडून गेला आणि स्वर्गवासी झाला. स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच 12 जानेवारी ह्याला "नॅशनल युथ डे" या स्वरूपाने संपूर्ण भारतभर साजरा केले जाते.

समाप्त।

मित्रांनो तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल काय वाटते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.

स्वामी विवेकानंद मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

विश्व प्रसिद्ध स्वामी विवेकानंद.

भारतीय थोर पुरुष स्वामी विवेकानंद.

नरेंद्रनाथ दत्त मराठी निबंध.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करुन सांगा.

धन्यवाद।

Similar questions