nibhand majhe kutumb majhe jawabdari
Answers
Answer:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' या राज्यव्यापी मोहीमेस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही सुरूवात करण्यात आली असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिका क्षेत्रात या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता 720 पथके तयार करण्यात आली असून एका पथकांत 2 ते 3 करोनादूत घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या ॲपवर नोंदणी करून घेत आहेतव सर्वेक्षण झालेल्या घरावर स्टिकर लावत आहेत.
15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर अशा मोहिमेच्या पहिला टप्प्यास सुरूवात झाली असून 5 हजारांहून अधिक घरांना भेटी देत पथकांनी त्यांची आरोग्य तपासणी करून माहिती संकलित केलेली आहे. तसेच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याचीही माहिती घेतली जात असून कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय अशीही माहिती संकलित केली जात आहे.
व्यक्तीची आरोग्य विषयक माहिती घेण्यासोबत या पथकामार्फत प्रत्येकाला नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असल्यास नियमित औषधोपचार घेणे, प्लाझमा डोनेशन अशी विविध प्रकारची कोरोना विषयक माहिती दिली जात आहे व व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे.
सर्वेक्षणाच्या दुस-या टप्प्यात 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान हे पथक पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन दुस-यांदा सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजणी करेल व त्याच्या नव्या नोंदी घेईल तसेच त्यावेळेची आरोग्य स्थिती लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करेल.
या सर्वेक्षणातून संकलीत होणा-या माहितीच्या आधारे लक्षणे आढळणा-या नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासोबतच आगामी काळात सहव्याधी (कोमॉर्बिड) असणा-या किंवा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.
तरी आपले नवी मुंबई शहर कोव्हीड मुक्त करण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत घरी सर्वेक्षणासाठी येणा-या पथकातील करोना दूतांना सत्य माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे तसेच स्वयंशिस्तीचे पालन करून कोव्हीड आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहचणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.