Hindi, asked by sumitsingh28, 11 months ago

nibhand of rain in Marathi​

Answers

Answered by zenangel
3

Answer:

उन्हाळ्यात खूप उकाडा होतो. तेव्हा आपल्याला पावसाची खूप वाट पाहावी लागते.कधी हा पाऊस अचानक येऊन टपकतो. पावसाळा दरवर्षी येत असला, तरी देखील प्रत्येक वर्षी आपल्याला पहिल्या पावसाचे कातुक वाटत .

पावसाळा सुरू व्हायच्या आधी शेतकरी जमीन नांगरून ठेवतो. शेतकर्याचे डोळे पुन:पुन्हा आकाशाकडे वळतात. मग अचानक वातावरणात बदल होतो. सूर्यनारायण अदृश्य

होतात. आकाशात काळे ढग गर्दी करतात. वातावरण अंधारून येते आणि पाऊस पडू लागतो.ढगांना खाली येण्याची घाई झालेली असते. टपोरे थेंब खालीयेतात आणि तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस कोसळू लागतो. सारा निसर्ग ओलाचिंब होतो. मातीचा सुगंध दरवळतो.

           पहिला पाऊस म्हणजे घरादारांची, वृक्षवेलींची जणू पहिली आंघोळच ! सारे वातावरण स्वच्छ होऊन जाते. लहान मुलांबरोबर मोठी माणसेही पहिल्या पावसात मनसोक्त भिजत असतात. पक्षीही मुक्तपणे पहिला पाऊस अंगावर घेतात. रानात मोर नाचू लागतात.शेतकरी आनंदाने आपल्या कामाला लागतात.

         दरवर्षी येणार्या या पाहुण्याच्या स्वागतासाठी लोक तयारी करतात. छत्रय, रेनकोट यांची खरेदी होते. ज्यांनी या पाहुण्याच्या स्वागताची तयारी कलला नसत त्यांची मात्र

ताराबळ उडते.

        कधी कधी हा पाऊस अखंड धो धो कोसळत राहतो. त्यामुळे ठिकठिकाणी भरपूर पाणी साचते. वाहने वाटेतच बंद पडतात. त्यांना पाण्यातून ढकलत न्यावे लागते. रहदारी

बंद पडते. शाळांना सुट्ट्या मिळतात; तर कार्यालये रिकामी पडतात. या अखंड बरसणाऱ्य पावसानेजनजीवन पार विस्कळीत होऊन जाते. तरीही हा पाऊस सर्वांना समाधान देतो.कारण पुढच्या भरभराटीची आनंदवातच तो घेऊन आलेला असतो.

Similar questions