India Languages, asked by ishrtshaikh786, 5 days ago

Nibhandh on corona virus in marathi​

Answers

Answered by aryan7287
4

कोरोना निबंध | Corona Marathi Nibandh |

कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे. संपूर्ण जगच त्याच्या विळख्यात सापडले आहे. परंतु खूप परिश्रमानंतर त्यावर आता लस शोधण्यात आलेली आहे. कोरोना नावाचा विषाणूंचा गट आहे. त्याचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या आजारास कोविड 19 असे नाव दिलेले आहे. 2019 मध्ये हा रोग मनुष्यात आढळल्याने कोरोना व्हायरस 19 म्हणजेच कोविड 19 (Covid 19) असे नाव देण्यात आले.

1960 च्या दशकात सर्वप्रथम मनुष्याला श्वसन मार्गात संसर्ग होणाऱ्या कोरोना व्हायरसचा त्रास आढळून आला. या आजारात कोरोना विषाणूंचे श्वसन मार्गात भयंकर संक्रमण आढळून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात कोरोना विषाणू संक्रमण झाल्याचे आढळले. सुरुवातीला वुहानमध्ये पसरलेला हा आजार संपूर्ण चीनमध्ये पसरला आणि त्यांनतर संपूर्ण जगभरात त्याने थैमान मांडले आहे.ताप, कोरडा खोकला, श्वसन मार्गात आणि घशात अडथळा, शारीरिक थकवा अशी लक्षणे या आजारात आढळून येतात. याव्यतिरिक्त इतर दीर्घ आजार ज्या व्यक्तींना असतील त्यांना त्याच आजारात वाढ झाल्याचे आढळून आले. स्वस्थ व्यक्तींना संक्रमण झाले तरी वरील लक्षणे दिसून येत नव्हती परंतु इतरत्र संसर्ग होऊन तोच आजार पसरू नये म्हणून आता सर्वत्र तपासण्या चालू आहेत. स्वयंसेवक, कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत.

रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, आणि इतर दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना आजारापासून जास्त धोका संभवतो. त्यांना या आजाराची लागण झाल्यास उपचार घेणे सक्तीचे ठरते. साधारण खोकला, ताप किंवा घशात खवखवणे असे आजार असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने हा संसर्गजन्य आजार आपण काही व्यक्तिगत सवयी पाळल्याने आणि काळजी घेतल्याने आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

कोविड 19 आजार संसर्गजन्य असल्याने आणि आजाराची वेगळी स्पष्ट अशी लक्षणे नसल्याने या आजारात एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना, फिरताना तोंडावर मास्क घालून जाणे अशी व्यक्तिगत काळजी आपण घेऊ शकतो. खोकताना किंवा शिंकताना तर रुमालाचा वापर करणे अत्यावश्यकच आहे. बाहेर गेल्यावर कोणत्याही पृष्ठभागाला अनावश्यक स्पर्श करणे टाळावे कारण कोरोना हा विषाणू दिसूनही येत नाही आणि लवकर नष्टही होत नाही.

नियमित बोलताना तीन फुटांचे अंतर ठेवावे. आंबट चवीच्या पदार्थांचा, फळांचा आहारात समावेश करावा. कोणतेच औषध शंभर टक्के उपचार देणारे नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच पर्याय आपल्यापुढे आहे त्यामुळे फळे, कडधान्ये, सुका मेवा, आणि जास्तीत जास्त “व्हिटॅमिन सी” चे आहारात सेवन करणे गरजेचे आहे.

कोरोना आजारात सरकारने संचार बंदी लागू केली होती जेणेकरून हा विषाणू पसरला जाऊ नये. निमशहरी आणि शहरी भागात कोविड 19 सेंटर्स उभारून त्यावर कोरोना लागण झालेल्या व्यक्तींना उपचार देण्यात आले. सर्व स्तरांवर काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. भारतात जवळजवळ चार महिने सर्व उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प पडून होते. रोजच्या लागणाऱ्या दैनंदिन वस्तू, सुविधा घरपोच पुरवल्या जात होत्या.

Similar questions