Nice essay on mazhi aai
In Marathi
Answers
Answer:a
Explanation:
dadadsaada
Answer:
जीवनातील सर्व पदव्यांनी गुच्छ होऊन स्वागताला जावे, इतकी 'आई' ही पदवी सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले जाते. आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झराच! साऱ्या दैवतांत 'आई' हे दैवत थोर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत 'आई' ही दोन अक्षरे कोरलेली असतात. आईचे प्रेम, तिच्या हळुवार स्मृती आपण सर्वजणच जपत असतो. बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी आई म्हणजे आपला पहिला गुरू! साने गुरुजी नेहमी म्हणत, "आई माझा गुरू, आई कल्पतरू!" आई म्हणजे ममतेच्या महन्मंगल नदीवर गजबजलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे असे म्हणतात, ते योग्यच आहे.
या मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही.
ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती. माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'
आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील.आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईचा विरह झाला असेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,
'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'
hope ae tula avadtho
avadla tar brainliest answer mark kar
#pihu's answer