Nisarg Ek kalavant Marathi essay
Answers
Explanation:
पाहता पाहता पूर्वक्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. अरुणोदय होत होता.रात्रभरासाठी विसावलेले सूर्यबिंब हळू हळू वर येत होते. पुर्वेकडचे आकाश केशरी,गुलाबी,पिवळ्या अशा विविध रंगांनी न्हाउन निघाले होते. पक्षी मंजुळ किलबिलाट करत उडत होते.
तेव्हा विचार आला की हा एवढा सुंदर देखावा काढणारा कलाकार आहे तरी कोण? होय,तो “कलावंत म्हणजे ‘निसर्गच’ होय!”
निसर्गची तुलना कलाकाराशी करताना ‘रणजित देसाई’ म्हणतात की सकाळ झाल्यावर कोवळे सुर्यबिंब उगवते, कलाकाराचा उदयही असाच होतो. नंतर सूर्यबिंब हळूहळू प्रखर होत जाते व मध्यान्हाचा काळ येतो तेव्हा त्याचे चटक सामान्य माणसाला सहन होत नाही. हाच काळ कलावंताच्या किर्तीचा आणि उत्कर्षाचा काळ होय. व सुर्य जसा पश्चिम क्षितिजाकडे धाव घेउ लागतो.. त्याचप्रमाणे कलावंताचेही होते. जेव्हा सुर्याचा अस्त होतो तेव्हा तो आपले सप्तरंग आकाशात उधळून जातो व दिवसाच्या अस्तापर्यंत ते असतात. याच प्रमाणे कलाकारांतर त्याची किर्ती सर्वदूर पसरते व जगाच्या अस्तापर्यंत टिकून राहते.
“श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोही कडे
क्षणात येती सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे!”
ह्या बालकवींच्या कवीतेतील वर्णन त्यांनी स्वतः निसर्गातील अनुभव घेऊन केले आहे. यात सांगितले आहे, श्रावण मासात सगळीकडे हिरवळ असते, कधी पावसाचा शिडकाव होतो तर कधी अचानक उन पडते. हे निसर्गात प्रत्यक्ष घडते. मग काय निसर्ग एका कवीच्या काव्यापेक्षा श्रेष्ठ नाही काय?
निसर्गात अनेक पक्षी, प्राणी मंजुळ स्वरात किलबिलाट करतात. हा स्वार काय मंजुळ सनईपेक्षा कमी आहे? ढगांचा गडगडाट व पावसाच्या सरी यांना स्मरुनच तर महाकवी कालिदासांना ‘मेघदुत’ स्फुरले.
निसर्गात अनेक सुंदर फुले,फळे विविध आकाराचे पाने, तसेच सप्तरंगी ईंद्रधनुष्य, सुंदर-सुंदर जीवंत निसर्ग देखावे जातीवंत चित्रकारालाच चितारता येणे शक्य आहे..म्हणुन
‘निसर्ग एक श्रेष्ठ कलावंत!’
Explanation:
निसर्ग एक कलावंती निबंध 10 लाइंस इन मराठी