India Languages, asked by vishwanathkulkarni65, 6 months ago

nisarg hach guru speech ​

Answers

Answered by Anonymous
3

निसर्ग माझा गुरू

हो, निसर्गसुका माझ गुरू आहे. गुरु आपल्याला नच्या अंधारातून जञानाच्या प्रकाशात आणतो. सरकारने अमृत पाजून आपल्याला खा भावाचे रूप देतो जो आपल्याला शिकाती, शान देतो, आपला आदर्श दुसऱ्यासमोर ठेवून आदर्श माना पाहयतो ती गुरू. मग निसर्गालासुबा आपला गुरू मानले पाहिजे. कारण निसर्ग आपल्याला विवि प्रकारचे ज्ञान देती, शिक्वण देतो, बोधप्रद धे देतो. "निसर्ग करा.से करा असे जरी सांगत नसला तरी तो आपल्या कृतीतून बरेच काही शिकयती, त्यासाठी आपल्याला त्या निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे. मी तो अनुभव घेतला आहे व नेहमी घेतच असतो. तो मला प्रत्येक वेळी नवीन धड़े देतच असतो. म्हणूनच निसर्ग माझा गुरू आहे.

मी जेव्हापासून निसर्गाशी एकरूप यायला लागलो, तेव्हापासून माला निसर्गाची विविध रूपे, घटक, आकार अनुभवायला मिळाले. निसर्गातील विविध पटक आपल्या कृतीतून काही ना काही शिकवतो व ते आकलन करण्याची मला आता सवयच लागली आहे. मी निसर्गाला का गुरु मानतो. याची काही उदाहरणे दिली तर तुम्हाला त्यातील सत्यता पटेल,

मग चला तर आपण निसर्गाशीच संवाद साधू या त्यांच्याशी एकरूप होऊ या. हे भध्य आकाश पहा. स्थाची कष्षणाला बदलणारी रूपे त्याचे तारूण्याचे रहस्य काय ते अनुभवा. खळखळ वाहणारे प्रवाह संकटाला सामोरे जाऊन सागराचे विशाल रूप धारण करतात. झाहे कथी बोलत नाहीत पण आपल्या कृतीतून बरेच काही सांगतात. सतत दान करा. छोटा-मोठा अमा भेदभाव करू नका. शरीराने व मनाने सतत तरूण राहा. आपल्या कृतीने इतराना सुखी, समाधानी आनंदी करा. पाने, फुले, पक्षी, किडे मुंग्या प्राणी, डोंगर, दऱ्या, शेते याचे तुम्हीही निरीक्षण का. आता तरी पटले ना 'निसर्ग माझा गुरू या विधानात किती सत्यता आहे ते!

Answered by Mahi2605
3

गाठताना, यशाची नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असताना, मानवाने निसर्गावर निर्णायक मात केलेली आहे,’ अशा प्रकारची दर्पोक्ती गेली ५०-६० वर्षं आपल्याकडे केली जात आहे. एका शालेय पाठ्यपुस्तकात जलचर प्राणी सदैव पाण्यात राहून कसे जगतात, त्यांचे जीवनव्यवहार कसे चालतात, याबद्दल माहिती देऊन अखेरीस म्हटलं होतं की, ’अशा प्रकारे विज्ञानाने या जलचर प्राण्यांबद्दल तपशीलवार माहिती आपल्यासमोर ठेऊन, ’जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे’ हे संतांचं म्हणणं खोटं ठरवलं आहे.’ म्हणजे या पाठ्यपुस्तक रचयित्याने विज्ञानाची महती गाता गाता तेवढ्यात संतांना एक चिमटा काढून घेतला. याचं कारण एवढंच की, संत बिचारे हिंदू होते. कुणीही उठावं आणि त्यांना काहीही म्हणावं! येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी सुमारे साडेचार हजार वर्षे, हे जगाचं वय आहे, असे बायबल म्हणतं. विज्ञानाच्या सध्याच्या अंदाजाप्रमाणे पृथ्वीचं वय ४.५ दशकोटी वर्ष एवढं आहे. ’मग बायबलचं म्हणणं विज्ञानाने खोटं ठरवलं आहे,’ असं म्हणण्याची कुणाची हिंमत का नाही? कारण साधं आहे. अशी हिंमत दाखवली, तर पुस्तक मंडळाकडून हकालपट्टी होईल, दौरे, चर्चासत्रं, सेमिनार्स वगैरे भौतिक फायदे मिळणार नाहीत.

तर ते कसंही असो. संत हे कोणत्याही भौतिक फायद्यासाठी काहीही करत नसून, जे सत्य आहे ते ठामपणे सांगत असतात. ’निसर्ग हाच माणसाचा खरा गुरू आहे. माणूस निसर्गाला जेवढा बिलगून राहील, निसर्गाशी जेवढी जवळीक साधेल, तेवढी निसर्गाची रहस्यं त्याला उलगडत जातील आणि त्याला चिरंतन सुख प्राप्त होईल,’ असं सगळ्या संताचं सांगणं आहे. ‘चिरंतन सुख म्हणजेच आत्मसुख’ हा व्यक्तिगत विकासाचा खूपच वरचा टप्पा झाला, पण वैज्ञानिकांचं म्हणणं असे आहे की, निसर्गाची सूक्ष्मनिरीक्षणं, अभ्यास केला तर अनेक भौतिक, व्यावहारिक सुखंदेखील आपल्याला मिळू शकतात. म्हणजे काय?

इंग्लंडमधल्या ’शेफिल्ड’ विद्यापीठातले संशोधक प्रा. फ्रान्सिस रॅटनिक्स यांनी मुंग्यांवर संशोधन चालवलं आहे. आपल्या वारुळापासून दूर असलेल्या खाद्यसाठ्याचा पत्ता मुंग्यांना कसा लागतो? यावर पूर्वीच संशोधन झालं आहे. पण, खाद्यसाठ्यांपासून वारुळापर्यंतचा जो मार्ग मुंग्या आखून घेतात, त्याबाबत प्रा. रॅटनिक्स यांनी अधिक संशोधन चालवले आहे. हजारो, लाखो मुंग्या अतिशय शिस्तबद्धपणे खाद्यावर तुटून पडतात आणि किंचितही गडबड-गोंधळ न करता कणाकणाने तो खाद्यसाठा आपल्या वारुळाकडे हलवतात. प्रा. रॅटनिक्स यांच्या मते, मुंग्यांच्या हालचालींच्या सखोल अभ्यासातून आपल्याला उत्तम ट्रॅफिक मॅनेजमेण्ट करता येईल. दररोज वाढणारी वाहनं आणि अपुरे पडणारे रस्ते ही जगातल्या सगळ्याच शहरांची डोकेदुखी आहे. मुंग्यांच्या वाहतूक व्यवस्थापनाच्या अभ्यासातून आपल्यालाही तसं सुविहित वाहतूक व्यवस्थापन करता येईल.

विमानाला आकाशात झेप घेण्यापूर्वी बराच मोठा स्टार्ट घ्यावा लागतो, हे आपल्याला माहीतच आहे. विमान जेवढं मोठं, तेवढा स्टार्ट आणखी मोठा. कमीत कमी स्टार्टमध्ये आकाशात झेप घेणारी विमानंही निघालेली आहेतच. विमानवाहू युद्धनौकांवर तीच विमानं असतात. पण, त्यांची इंजिनं अधिक शक्तीशाली बनवावी लागतात. आता मोठ्या शक्तीचं इंजिन म्हणजे जास्त ऊर्जा पाहिजे. जास्त ऊर्जा निर्माण व्हायला इंधनही जास्त पाहिजे. म्हणजे मामला फार खर्चिक बनतो. विमानवाहू युद्धनौकेवरून झेप घेणार्‍या विमानाच्या प्रत्येक उड्डाणामागे मोठ्या रकमेचा खड्डा सोसावा लागतो.

अमेरिकेतल्या ’पासादेना’ इथल्या ’कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधले संशोधक मायकेल डिकिन्सन यांना असं आढळलं आहे की, मधमाशा व गांधीलमाशा या चटकन झेप घेतात. कोणताही पक्षी झेप घेताना पंखांची हालचाल करत असतो. प्रत्यक्ष उडत असतानाही गती कमी जास्त करण्यासाठी वा तरंगत राहण्यासाठी त्यांना पंख हलवावे लागतात. उडणार्‍या कीटकांना हेच करावं लागतं, मधमाशा व गांधीलमाशा झेप घेताना व उडत असताना पंखांची कमीत कमी हालचाल करतात आणि तरीही त्यांचे उड्डाण सफाईदार असते. त्या वाटेल तेवढ्या अंतराचा पल्ला गाठू शकतात. म्हणजेच, कमीत कमी उर्जेचा वापर करून, त्या आपल्या हालचाली करतात. आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत उड्डाणशास्त्रातल्या या विशेष शाखेला ’एअरो डायनॅमिक्स’ असं म्हणतात. मधमाशांच्या या एअरोडायनॅमिक्सवर सखोल संशोधन करून, कमी उर्जेत चटकन झेप घेणारी हलकी विमानं बनवता येतील, असं मायकेल डिकिन्सनना वाटत आहे.

ताकानोरी इटो आणि किकुकात्सु इटो हे जपानी संशोधक एका विशिष्ट प्रकारच्या कोबीवर संशोधन करत आहेत. हा कोबी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तरी त्याचं तापमान बदलत नाही. ते कायम २० अंश सेंटिग्रेड एवढंच राहतं, असं त्यांना आढळलं. अधिक संशोधनात त्यांना असंही आढळलं की, बाहेरचे तापमान कितीही खाली जाओ, अगदी गोठणबिंदूच्याही खाली गेलं, तरी हा कोबीचा गड्डा २० अंशांचा आपला तापमान बिंदू जराही सोडत नाही. तो, म्हणजेच ती वनस्पती हे कसं साध्य करते. हे जर समजलं तर हिवाळ्यातल्या अनेक समस्यांवर उत्तर सापडेल.

ही तीनही संशोधनं वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत. पण, त्यांच्यातला समान धागा म्हणजे ते निसर्गाने निर्माण केलेल्या काही सजीव रहस्यांवर संशोधन करत आहेत आणि ते करताना आपण निसर्गावर मात वगैरे करायला निघालोय असा दिखाऊ अभिनिवेश त्यांच्यापाशी नाही. उलट, सगळ्यांच्या म्हणण्याचा आशय असाच आहे की, निसर्गाजवळ वेगवेगळ्या आधुनिक समस्यांचीदेखील उत्तरं आहेत. आपल्याकडच्या कथित विचारवंतांना हे लगेच पटेल, कारण सांगणारे गोर्‍या चामडीचे आहेत ना!’

Mark it as brainliest

Similar questions