Nisarg manavacha guru speech in marathi
Answers
your question is not clear..........
■■ 'निसर्ग मानवाचा गुरु' या विषयावर भाषण■■
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करते.आज 'विश्व पर्यावरण दिवसानिमित्त' मी इथे 'निसर्ग मानवाचा गुरु' या विषयावर थोडं बोलू इच्छिते.
निसर्ग आपल्या मानवजातीसाठी खूप महत्वपूर्ण आहे.निसर्गाचा प्रत्येक घटक खूप उपयोगी असून आपल्याला कशा ना कशा प्रकारे शिकवतच असते.झाडे,सूर्य,चंद्र,फुले,पाऊस,पर्वत,शेत,नदी सर्व काही निसर्गामध्ये शामिल आहेत.
सूर्य आपल्याला शक्तिशाली परिस्थितीतही विनम्र राहण्यास शिकवतो.चंद्र आपल्याला वाईट,गडद आणि कठीण प्रसांगाच्या वेळी शांत राहायला शिकवतो.झाडे आपल्याला उदार,क्षमाशील आणि संयमशील राहायला शिकवतात.
नदी आपल्याला कठीण परिस्थितींमाध्ये स्वतःचा मार्ग शोधायला शिकवते आणि सतत पुढे राहायला शिकवते. फुले आपल्याला वातावरणात आपल्या चांगल्या कर्मांचा सुवास पसरवायला शिकवतात.
अशा प्रकारे,निसर्ग आपला उत्तम गुरु असून निसर्गाचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.