Hindi, asked by dion1, 1 year ago

nisarga maza mitra essay in marathi

Answers

Answered by MVB
882
माझा विश्वास आहे की निसर्ग माझा सर्वात चांगला मित्र आहे.

महान घराबाहेर प्रेम करत असताना, माझ्या जीवनाचा पृथ्वी बनविणाऱ्या विविध प्रजाती आणि घटकांसारख्या जीवनातील गोष्टींबद्दल मला मोह करण्यात आलं आहे. आपण आपल्या घरापासून बाहेर पडून आणि 100 पटीने चांगले श्वास घेऊ शकता असे मला वाटते तेव्हा मला त्या ताजे खोल श्वास घेण्यास प्रेम आहे. बाहेरच्या घरापेक्षा घरांपेक्षा चांगले लोक, परंतु माझ्यासाठी, मी बाहेरच राहतो.

लहानपणीच वाढले, माझ्या वडिलांनी नेहमीच मला सगळीकडे मला जीवनातील सुंदर गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न करीत ठेवले आहे. मी 6 वर्षापासून स्नोबोर्डिंग आणि स्कीइंग सुरु केले आणि तेव्हापासून त्यातील प्रत्येक सेकंदाला प्रेम केले. मी टेकडीवर खाली गतीची भावना जाणवत आहे जसे की मी आकाशातून उडणारी पक्षी होती. मी टेकडीच्या खाली उडताना, मला वाटू शकते कि वारा धिम्यामुळे थंड होत आहे आणि माझ्या शरीरातला हा ठिसूळपणा जवळजवळ कमी होत असताना माझे शरीर त्या हलणार्या प्रतिक्रिया देण्यास तयार करते. मी अनेक वेळा मेहनत घेतली आहे परंतु सेथ वेशकोटपासून मिळालेल्या बुद्धीच्या शब्दांची उजळणी करण्याचे धाडस नेहमीच होते. जेव्हा मी त्या उंच डोंगरावर उभा राहिलो तेव्हा माझ्या आजूबाजूला पाहता पाहता, मला हे दर्शविल्याबद्दल मी माझ्या बाबाला धन्यवाद देतो आणि निसर्ग मला प्रेम करायला लावतो.

दुसरी गोष्ट जी मला आवडते ती गोष्ट उन्हाळ्यात कॅम्पिंग करणार आहे ज्यामुळे त्या उंच उंच पर्वत जो जगातील विचार करू शकेल. मी माझ्या प्रवासाच्या प्रवासावर जात असताना, मला या गोष्टी करण्यात सक्षम होऊ शकतील अशा महान परिसरात राहण्यासाठी एक क्षण नेहमी असतो. मी तुम्हाला चालत असलेल्या डोंगरावर चढताना किंवा वेगवेगळ्या जनावरांना पहायला आवडतो जेणेकरून आपण चुकून एक अवाढव्य चिखलाची खड्ड्यात जाऊ शकता.

Answered by tejasmba
789

निसर्ग माझा मित्र

अनेक कवींनी व लेखकांनी निसर्गाचे वर्णन आपल्या कविता आणि लेखां मधून केले आहेत. पण निसर्ग म्हणजे नेमक काय?

निसर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंच तत्त्वांनी बनलेली सृष्टी. या निसर्गाचे व मनुष्याच नात अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. मनुष्याच जन्म याच निसर्गाच्या पंच तत्त्वातूनच होतो. व त्याच पंचतत्त्वात विलीन होतो. तेव्हा निसर्गाशी आपल नात अतूट नाही का आहे?  आपण या निसर्गात जन्म घेतो, वाढतो, व शेवटी विलीन होतो. आणि म्हणूनच या निसर्गाच जतन करणे ,पोषण करणे त्याची वृद्धी करणे हे आपले कर्तव्य आहे.

निसर्ग हाच आपला गुरु, हाच आपला मित्र व हाच आपला डॉक्टर सुद्धा आहे. निसर्ग आपणा करता खूप मोठा वरदान आहे. त्याच्या कडन आपणास आवश्यक सर्व घटक जस पाणी, राहण्यास घर व अन्न सुद्धा मिळते. निसर्गाच्या सोबतीत आपणास किती काही शिकायला मिळते. जस फूल काट्यात फूलते तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहवे. झाडांप्रमाणे खंबीर उभ राहून नेहमी दुस-यांना मदद करणे. नदी जशी कितीही अडथडे आली तरी सतत वाहतच असते तसच आपणही सर्व कष्टानां न घाबरता सामोरे जाणे. आणखी बरच काही हा निसर्ग आपणास शिकवतो. मग तोच नाही का आपला खरा गुरु.

निसर्ग तर खरा चित्रकार आहे. किती रम्य चित्र तो रोज रंगवतो व आपणास प्रेरणा देतो. खोल द-या खो-या, निर्मळ झरे तलाव, रम्य अथांग सरोवरे, बेफाम समुद्र, घनदाट अरण्य, बर्फाच्छादित शिखरे, उतुंग पर्वत, कमळांनी भरलेली तळे, वां-याच्या झोक्यावर डोलणारी हिरवीगार शेते, नारळी केळांच्या बागा, डोंगरा आडून उगविणारा सूर्य व त्याची सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी सूर्य किरणे. हे सर्व किती किती सूंदर आहे. आणि याचा अनुभव आपण रोज करतो.

येवढच नाही तर या निसर्गात समावतात ते वेगळे वेगळे ऋतू. हे निसर्गाचे ऋतुचक्र पण जाता जाता दु:खानंतर सुख येतेच असा संदेश देत जातात. रिमझिम पाउस व त्यामुळे उठणारा मातीचा सुगंध, तसेच थंड वा-याची झोका, व त्या बरोबर येणारा फुलांचा सुगंध, उन्हाळ्यात हीच झुळूक मनाला जीवाला किती मनमोहक वाटते. समुद्राच्या लाटा, पक्षीची किलबिल, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, सूर्यास्ताच्या वेळीस तांबूस होत जाणारे आकाश, सर्व काही निसर्गाची किमया आहे. निसर्गाने आपणास दिलेले देणगी आहे.

निसर्ग आपणास जिवलग मित्रा प्रमाणेच काहीही न मागता देखील केवढ काही देतो. मग आपणही या निसर्गाला काहीतरी दिले पाहिजे न.

 वाढत्या आधुनिकरणा मुळे व वाहतुक पाणी प्रदूषणा मुळे निसर्गाचे सौंदर्य दिवसे न दिवस कमी होत आहे. आकाशातील चांदोबा उंच उंच इमारतीच्या मागे लपलेला आहे. जंगल तोड मुळे पाउस कमी पडत आहे. आणि यामुळे निसर्गाच्या भयंकर रूपाचे दर्शन आपणास घडत आहे. अतिवृष्टीने नदया नाल्यांना पूर येऊन शहरेच्या शहरे नष्टय होत आहेत. तर कधी भूकंपाने हजारो घरे जमीनदोस्त होत आहेत.

तेव्हा आपल हे कर्तव्य आहे कि निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे कारण मनुष्याच व निसर्गाच अतूट नाते आहे. निसर्गापासून आपणास कितीकाही शिकायला मिळत आणि म्हणूणच निसर्ग हाच माझा गुरु सोबती, सखा व मित्र आहे.

 

 

 

 

 

Similar questions