nisargachi jopana Karya essay in Marathi language in 500 words
Answers
Answer:
I don't know marathi language sorry
■■निसर्गाची जोपासना करा■■
निसर्गाने आपल्याला झाडे,पक्षी,प्राणी,हवा,नदी,सूर्य,चंद्र,हवा आणि इतर कितीतरी मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.निसर्गातील ही संसाधने कशा न कशा प्रकारे आपली मदत करत असतात.
निसर्गाने भरपूर प्रमाणात आपल्याला ही संसाधने दिली आहेत.पण,लोकसंख्या जसजशी वाढत आहे,तसतसे संसाधनांची मागणीही वाढत आहे.
जर आपण या प्राकृतिक संसाधनांचा उपयोग वेगाने करत गेलो,तर आपल्या पुढच्या पिढीसाठी ही संसाधने उरणार नाही.त्यामुळे,निसर्ग आणि त्याच्या संसाधनांना जोपासणे खूप आवश्यक आहे.
निसर्गाला जोपासायला आपण पुढील काही उपाय करू शकतो.पाणी जपूण वापरणे,वीजेचा वापर कमी करणे,कागदाचा वापर कमी करणे कारण कागद झाडाच्या लाकड़ापासून बनवले जाते.
शेती करण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करणे,जेणेकरून पर्यावरणावर वाईट परिणाम होणार नाही.याच बरोबर लोकांना निसर्ग संरक्षणाबद्दल जागृत करणेसुद्धा, खूप महत्वाचे आहे.
निसर्गाला जोपासणे खूप गरजेचे आहे आणि हे मनुष्य त्याच्या बुद्धीने आणि क्षमतेने करू शकतो.