India Languages, asked by konkarpranjal546, 5 hours ago

ऑनलाईन शाळा आणि मी
eassy in Marathi​

Answers

Answered by nlolageanishika
0

साल 2020 मार्च महिना उजाडला आणि हळू हळू घरी असो किंवा शाळेत असो सर्वत्र एकच कुजबुज कानावर येऊ लागली ती म्हणजेच कोरोना नामक एका विषाणूची जगभरात साथ पसरली आहे आणि हे सर्व काय आहे कस आहे हे समजेपर्यंतच आमच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

आम्ही सर्व मित्रमैत्रिणी या सुट्टीने आनंदी झालो होतो की आता आपल्याला मस्त 7-8 दिवस सुट्टी मिळणार परंतु आम्हाला जाहीर झालेल्या या सुट्टीनंतर आमची शाळा सुरु होण्यासाठी पुढे इतके महिने लागतील याची किंचितशी ही कल्पना आम्हाला कोणालाच नव्हती. कारण त्यानंतर जवळपास महिना- दीड महिनाभर म्हणजेच एप्रिल अखेरीसपर्यंत शाळा सुरु झाल्याचं नाही आणि आम्ही वार्षिक परीक्षेशिवायच पास होऊन पुढील वर्गात गेलो.

आता जूनमध्ये आपण सर्व मित्रमैत्रिणी एकत्र मिळणार आणि कोरोनामुळे अचानक जाहीर झालेल्या काही दिवसांच्या सुट्टीनंतर आपण पुन्हा शाळेत जाणे सुरु करणार या आशेवर असतानाच अचानक एक बातमी कानावर आली की कोरोना हया वायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे येणाऱ्या जून महिन्यातही शाळा सूरु करता येणार नव्हती व त्याचा पर्यायी मार्ग म्हणून आमची शाळा ही ऑनलाईन भरणार होती.

' ऑनलाईन शाळा ' हा शब्द जरी शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन असला तरी आम्हा सर्वाना त्याचे खूप कुतूहल ही होते. माझी शाळा आता ऑनलाईन भरणार होती.

अखेर जून महिन्यात माझी ऑनलाईन शाळा सूरु झाली. परंतु या वर्षी मात्र माझ्या शाळेचा पहिला दिवस जसा मागील वर्षी होता तसा नसून काहीसा वेगळा होता. मी शाळेचा गणवेश घातला होता. मी शाळेचे दप्तर ही जवळ घेतले होते परंतु मी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर न जाता तेच सर्व साहित्य घेऊन घरातच बसलो होतो आणि माझी ही अशी ऑनलाईन शाळा पूर्ण करण्यासाठी आजपासून मला साथ लाभणार होती ती माझ्या मोबाईलची. मोबाईलचे जसे दुष्परिणाम आहेत तसेच आज याच मोबाईलमुळे माझी ऑनलाईन शाळा भरणार होती हा त्याचा फायदा मला आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना झाला होता.

शाळेची वेळ झाली आणि मी माझा मोबाईल सुरु करून शाळेकडून मिळालेल्या लिंक वर क्लिक केले आणि क्षणार्धात माझी ऑनलाईन शाळा सुरु झाली. मोबाईल समोरच्या स्क्रीनवर माझ्या वर्गातील सर्व मुले आपापल्या घरून ऑनलाईन शाळा करण्यासाठी बसलेले मला दिसले.

पहिल्यादा काहीच कळत नव्हते की कोणते बटण दाबले की आपला आवाज इतरांना जातो, कोणते बटन दाबले की मी दिसतो किंवा दिसत नाही हे सगळ मी शिकू लागलो. काही वेळातच आमच्या वर्गशिक्षिका ही मला मोबाइलच्या स्क्रीन वर दिसू लागल्या. त्या उभ्या असलेल्या मागील बाजूस शाळेसारखाच एक फळा होता ज्यावर त्या आम्हाला आता शिकवणार होत्या.

माझी ही ऑनलाईन शाळा मोबाईलवर शिकण्याचा हा वेगळाच अलौकिक अनुभव होता. सर्व काही पूर्वीच्या शाळेसारखेच. तेच शिक्षक, तेच मित्र, तसाच फळा परंतु सर्व फक्त मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात राहून शाळा सुरु होती.

माझ्या हया ऑनलाईन शाळेत पूर्वीच्या शाळेसारखे सगळेच होते अगदी मधली सुट्टी ही होते परंतु जसे पूर्वी आम्ही मधल्या सुट्टीत एकमेकांबरोबर दंगा मस्ती करत असायचो तसें आता नाही करू शकत. आता मधल्या सुट्टीत आम्ही आपापल्या घरी बसून जेवतो. माझ्या या ऑनलाईन शाळेत एक तास संपला की घंटा वाजवायला कोणीही शिपाई काका नाहीत.

माझ्या या ऑनलाईन शाळेत क्रिडांगणावर खेळण्यासाठी आम्ही जाऊ शकत नाही. माझ्या या ऑनलाईन शाळेच्या दिवसात किती ही मोठा पाऊस आला तरी मी भिजत नाही किंवा शाळेला सुट्टी मिळावी अशी अपेक्षा करत नाही. माझ्या या ऑनलाईन शाळेत मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मित्रांना चॉकलेट देऊ शकत नाही. तरीही माझी ही ऑनलाईन शाळा विशेष आहे.

कोरोना नामक या आजाराने जगभरात अचानक डोकं वर काढले आणि आम्हा विद्यार्थांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाईन शाळा ही संकल्पना पुढे आली. ऑनलाईन शाळेची मुख्य उद्दिष्टे हीच आहेत की आमच्या शिक्षणाचे कोणत्याही परिस्थिती मध्ये नुकसान होऊ नये.

ऑनलाईन शाळेच्या वर्गामध्ये शाळेसारखे बाक नसतील जेथे आम्ही सर्व विद्यार्थी बाजूबाजूला बसून शिकत असू परंतु आम्ही स्क्रीन वर ही एकत्रच मिळून शिकतो. या अशा शाळेतही आमचे शिक्षक त्यांचे पूर्ण प्रयत्न करून आम्हाला प्रत्येक धडा आणि गणिते, व्याकरण व इतर गोष्टी संपूर्ण समजेपर्यंत शिकवितात. आम्हाला जर काही शंका असेल तर त्या मनापासून समजावून सांगतात. आमच्या या ऑनलाईन शाळेत गेला वर्षभर आपापल्या घरूनच आम्ही अनेक सण उत्सव ही साजरे केले.

ऑनलाईन शाळा सुरु असताना मधेच नेटवर्क गेले तर शिकवलेलं काहीच समजत नाही ते पुन्हा नव्याने समजून घ्यावे लागते. घरातील मागील आवाज आणि घरातील छोट्या मोठ्यां अडचणीमुळे ऑनलाईन कलासमध्ये लक्ष केंद्रीत करण्यास जणू प्रत्येक विद्यार्थ्यांचा कसचं लागतो. जे पूर्वीपासून शाळेत एकसमान शिकण्याची जी सवय होती ती घरातील ऑनलाईन शाळेमुळे काहींशी गोंधळाची ही होते.

ही ऑनलाईन शाळा करण्याचा अनुभव खरंच वेगळा असला तरी कधी कधी विचार येतो की अजून किती अशी ऑनलाईन शाळा सुरु राहणार? पुन्हा कधी शाळेच्या सूचना फलकावर शाळा नियमितपणे सुरु होण्याची बातमी लिहिली जाईल? पुन्हा कधी शाळेच्या क्रिडांगणावर गप्पा गोंधळांचा किलबिलाट होईल? पुन्हा कधी शाळेबाहेरील झाडाखाली चिंचा पडण्यासाठी आम्ही सर्व एकत्र जमा होऊ? पुन्हा कधी दप्तरामध्ये वह्या पुस्तके घेऊन मी माझ्या सायकलने शाळेत जाईन? कारण शाळा ही विद्येचे मंदिर आहे त्यामुळे तेथे जाऊन शिकण्यातच खरी शाळा अनुभवल्यासारखे मला वाटते.

अश्या एक ना अनेक काहीही गोष्टी असल्या तरी पण त्याचबरोबर न विसरता मला मात्र आज माझ्या सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आणि आणि त्यांचे कौतुक करावेसे वाटते की या ऑनलाईन शाळेत इतक्या विद्यार्थांना व्यवस्थित सांभाळून घेऊन त्यांनी आपल्या प्रयत्नांनी कोरोनाच्या गंभीर पश्वभूमीवर शिक्षणाचे हे अमूल्य कार्य सतत सुरु ठेव

Answered by dalvirupali52
0

Answer:

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय? सोप्या भाषेत, आपण ऑनलाइन शिक्षण ही एक प्रणाली समजू शकतो ज्याद्वारे विद्यार्थी स्वतःच्या घरातून इंटरनेट आणि संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅब्लेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शिक्षण घेऊ शकतात. या नव्या शिक्षण पद्धतीत अंतर आणि वेळ यांचे अडथळे पूर्णपणे दूर झाले आहेत.

Similar questions