ऑनलाइन पद्धतीने तुमच्या शाळेत साजरे झालेली गुरू पूर्णिमा. बातमी लेखन
Answers
Answer:
प्राथमिक शिक्षक मंडळ शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश थोरात उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश अत्रे उपस्थित होते. संस्थेचे चिटणीस अनिल नवले यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व गोष्टीरूपात सांगितले. या वेळी आकाशवाणीच्या मृदुला घोडके, दीपक वैद्य, भक्ती कोराड, विजय अगरवाल, नीतेश गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पारकर यांनी केले. आभार रिना ब्राह्मणे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शुभांगी सदनकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
फोटो : प्राथमिक शिक्षक मंडळ शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेतील मुलांचा सत्कार करण्यात आला.
अंकुर विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमा
पुणे : अंकुर विद्यामंदिर (फर्ग्युसन कॉलेज आवार) येथील सर्वसमावेशित शाळेत विशेष आणि सामान्य मुलांनी एकत्रितपणे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संस्थापिका माधुरी देशपांडे आणि शाळेचा विद्यार्थी कवीश कवठेकर यांच्या हस्ते ध्वजपूजनाने झाली. प्रसिद्ध गुरू-शिष्यांच्या जोड्यांचा कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. पर्यावरण, निसर्ग, पशू-पक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक अशा सर्व सजीव, निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही दिली.