India Languages, asked by shamshaadshaikhss14, 2 months ago

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे निबंध​

Answers

Answered by hardiklomate53
8

Answer:

ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. आधी शाळेत गेल्यावर शिक्षेचे भयाने विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षकांचे शिकवणे ऐकत असे. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात आणि कित्येकदा ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत.

ऑनलाइन शिक्षणाचे तोटे

ऑनलाईन शिक्षणात वेळ आणि पैसा दोघींची बचत होते. परंतु असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. ऑनलाइन शिक्षणाचे देखील तसेच आहे. जसे एकीकडे याचे फायदे आहेत त्याच पद्धतीने अनेक नुकसान व दुष्परिणाम देखील आहेत. आपल्या देशात अजूनही अनेक खेड्या गावात इंटरनेट उपलब्ध नाही आहे व ज्या लहान शहरांमध्ये इंटरनेट आहे तेथे त्याची गुणवत्ता फार चांगली नाही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य नेटवर्क ची आवश्यकता असते.ऑनलाइन शिक्षणाचे फायदे

ऑनलाइन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप म्हटले जाऊ शकते. ज्यात विद्यार्थ्यांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या लॅपटॉप वरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल / कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असायला हवे. आज शाळा, कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोचिंग साठी घराबाहेर न जाता, घरीच राहून निश्चिंतपणे शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. विदेशात शिक्षणाची ईच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने व्हिडिओ थांबणे, आवज ऐकू न येणे किंवा व्हिडिओ अडकणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

आपल्या देशात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात ई एज्युकेशन अर्थात ऑनलाइन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झाले आहे. ऑनलाइन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेट चा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.

आपल्या देशात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात ई एज्युकेशन अर्थात ऑनलाइन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झाले आहे. ऑनलाइन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेट चा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.

आज शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. कारण चांगला शिक्षणाच्या बळावरच योग्य करिअर निवडले जाऊ शकते. कोणत्याही देशाला विकसित करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे.

Similar questions