ऑनलाइन शाळेतील शिक्षक आणि वास्तविक शाळेत शिक्षक
या विषयावर निबंध लिहा
Answers
Answer:
पण शाळांची घंटा घणघणली नाही. गेल्या अनेक वर्षांत अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा आता घंटेवर नाही, तर बटणावर उघडल्या आहेत. गुगल क्लासरुम, झूमसारख्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणाची गंगा वाहू लागली आहे....
ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना वरवर खूप सुंदर, सहज, टेक्नॉसॅव्ही वाटत असली तरी ती यशस्वी करून दाखवणं वाटतं तितकं सोपं नाही. नवीन गोष्ट म्हटली की सुरुवातीला तिचं कौतुक असतं तसं मुलं उत्साहानं या ऑनलाइन वर्गांना बसू लागले आहेत. खरं तर अनेक मुलांना हे माध्यम वेगळं वाटतंच नाही, इतकं सहजपणे त्यांनी ते आत्मसात केलंही आहे. मीटिंग कोड, मेल पालकांना एकवेळ कळत नसतील पण मुलांनी बरोब्बर शाळांच्या सूचना पटापट कॅच करत मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरवर शाळेच्या वर्गांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे. पण सतत मोबाइल स्क्रीन आणि कानात खोल घुमणारा आवाज त्यांना किती काळ सहन होणार आहे हाही प्रश्न आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये एक स्वाभाविक प्रत्यक्ष संवाद असतो, तो कदाचित या माध्यमात तितका चांगला साधला जाणार की नाही हेही अद्याप अस्पष्ट आहे. समोर हेडफोन लावून बसलेल्या मुलाचं 'हेड' वर्गातच आहे ना हे पालकांना कसं उमजेल हेही न कळे. या प्रश्नांची उत्तरं काळाच्या ओघात मिळतील...पण तूर्त केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांना सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण नेमके कसे द्यायचे, त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करायचा ते मुलांना एकाजागी बसवायचे कसे अशा मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.
Explanation:
hope it helps u...
mark me as a brainliest......