India Languages, asked by sanikabanne2005, 4 months ago

ऑनलाइन शाप की वरदान निबंध मराठी​

Answers

Answered by sntomar12
2

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण इंटरनेट शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. इंटरनेटचा वापर करणे आजकाल फार सामान्‍य झाले आहे. परंतु जसा इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्‍यांचे वाईट व चांगले परीणाम स्‍पष्‍ट दिसायला सुरूवात झाली आहे. इंटरनेटचे फायदे तोटे (internet che fayde tote) या निबंधात सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

निसर्गाने दिलेल्या शक्तीचा वापर हा माणसाच्या मतावर आणि त्याच्या माणुसकीवरच अवलंबून आहे. भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केलेल्या अविरत मेहनतीचे फळ म्हणजेच आजच्या भौतिक सुधारणा होय. त्यांपैकी इंटरनेट हे सुद्धा एक होय. हे दिव्य ज्ञान आता वरदान आहे की शाप हे खालील मुद्द्यांवरून ती स्पष्ट करू इच्छितो.

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे संकेतस्थळांवर (वेबसाईट) साठवलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता होतो. इंटरनेटच्या माध्यमातून आपण काही गोष्‍टींचा उत्कृष्ट वापर करू शकतो. जसे e - बँकिंग, e - कॉमर्स, e - चौपाल, e - मेल इत्यादी. म्हणजे आज इंटरनेट वापर ही नित्याची बाब झाली आहे.इंटरनेटला मेलच्या (संदेशाच्या) माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 'साबीर भाटीया' या युवकाने 'हॉटमेल'चा शोध लावून केले. सध्या न्यूयॉर्क शिकागो, पॅरीस इत्यादी ठिकाणी अनेक कंपन्यांचे 'माहिती साठवणूक केंद्रे' आहेत व त्या माध्यमातून भूस्थिर उपग्रहाच्या साहाय्याने संकेतस्थळांचा वापर करून हवी ती माहिती इंटरनेटवरून मिळवता येते.

इंटरनेटचे संकेत स्थळ असलेले 'Google Earth' हे लष्‍करी दृष्‍टीकोनातुन बघीतले एक शापच आहे. उपग्रहाच्या साहाय्याने जगातील कुठल्याही ठिकाणांची चित्रे व चित्रफिती कोणत्याही अडथळ्याशिवाय बघणे हे लष्करीदृष्‍टीकोनातुन अतिशय हानिकारक आहे.

'इंस्टंट न्यूज'सारखे 'ब्लॉग' तयार होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळेच चुकीची माहिती सर्रास उपलब्ध असते. ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या गंभीर बाब आहे. 'व्हायरस' ही इंटरनेटला लागलेली कीडच होय. अशी प्रोग्राम्स तयार करणे ही समाजाला लागलेली कीड, असाध्य रोग आहे. विशेषतः इंटरनेटच्या माध्यमांतून मुलींसोबत होणाऱ्या गैरव्यवहाराचे प्रमाणसुद्धा अतिशय जास्त वाढले आहे.

Similar questions