'ऑपरेसशन ब्लु स्टार' ची थोडक्यात माहिती लिहा.
Answers
Answer:
ऑपरेशन ब्लू स्टार हे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.[१] अमृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला.[२] तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्यावसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले. अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टार चा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली. पण सुवर्णमंदीरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमंदीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणिती पुढे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले.
Answer: