Old is gold essay in Marathi
Answers
*जुनं ते सोनं*
जुनं ते सोनं ही एक म्हण आहे. ही म्हण जुन्या गोष्टींचा महत्व सांगते. सोन्याची किंमत वेळेसोबत कमी होत नाही, ते कधीच जुने होत नाही.
जुन्या गोष्टी, अनुभव, आठवणी आणि लोक सगळं सोन्यासारखाच खूप मौलवान असतं. जुने लोक, म्हणजेच वयाने जास्त असलेले लोक असतात त्यांच्याकडे खुप अनुभव असतो आणि तो अनुभव आपल्याला आयुष्यात उपयोगी पडतो. गोष्टी जुन्या होतात तशी त्यांची किंमत वाढत जाते. उदाहरण म्हणजे जे जुने किल्ले आहेत ते अमूल्य आहे, त्यांची तुलना कोणाशीच करता येत नाही आणि ते आपल्याला आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीची आठवण करून देतात. आपल्याला शौर्यचे धडे देतात.
आपण आपल्या लहानपणीचे दिवस आठवतो आणि आपल्याला आनंद होतो. ते जुने सोन्यासारखे दिवस परतावे असे वाटते. कारण त्यात आपल्या गोड आठवणी असतात.
सर्व जुन्या गोष्टी तो दागिना असो व भांड किंवा शिक्षक असो व घर, ते आपण नेहमी मनात जपून ठेवतो.म्हणून म्हणतात जुने असते ते सोन्यासारखे असते.