India Languages, asked by abhinav5711, 10 months ago

ओळखा पाहू मी कोण? कटकुळे पाय उंच उडी खाय,वाऱ्यासारखे पळत जाय 2हळूहळू वाढतो मी हळूहळू घटतो,महिन्यात एक दिवस सुट्टी घेतो 3घास घास घासला तर झिजत जातो,कितीही घासा सुगन्धच देतो 4डूल डूल डुलत ,वाऱ्याने हलत ,पाण्यानं वाकत, जागीच राहतं 5पाऊस नाही पाणी नाही रान कसं हिरवं गार, कात नाही चुना नाही तोंड कसं तांबडंलाल 6बाळ हातभर ,जावळ कोपरभर 7चम चम चांदणी वाटोळे दार,हळूच घाल दादा दुखते फार 8तीन पायांची दगडी राणी ,खाते लाकूड पिते पाणी 9पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नाही,पावसाचं भविष्य सांगतो पण ज्योतिषी नाही 10खजिन्याला एका कुलूप ना कडी,कितीही धन लुटा, वाढे घडीघडी 11काळी शाल,काचेचा महाल,रात्रीचा पहारा,अंधारात सहारा 12पाण्यापेक्षा हलका ,विषापेक्षा कडू,जवळपास असला तर येईल रडू 13जागेवरून न हलता आपले अन्न मिळवतो व भरभर वाढतो 14निळ्या काळ्या वावरात पेरल्या बिया ,रोज रोज पेरल्या तरी जाती वाया 15तिरपा डोळा कोट काळा, खाण्यावर याचा नेहमी डोळा

Answers

Answered by SomnathBhangare
0

Answer:

1. हरिण

2. चंद्र

3. चंदन

4. दगड

5. तंबाखू

9. ढग

10. ज्ञान

12. कांदा

Explanation:

मला सगळी उत्तरं देता आली नाहीत याबद्दल मी आपली क्षमस्व

plzzzzz mark this answer as brainlist....

Similar questions