Hindi, asked by vyaschetan54, 11 months ago

OLXiy+
प्रयत्नाने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.​ I want meaning of this sentence . I will mark this answer as brainlist and also follow you

Answers

Answered by hadkarn
5

Answer:

"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे." is a Marathi Proverb and it's English translation is

"You can extract oil from dry sand if you don't give up."

Answered by rajraaz85
2

Answer:

"प्रयत्नाने वाळूचे कण रगडीता तेलही गळे" या सुभाशिताद्वारे संत रामदासांनी एक अतिशय उत्तम असा मार्ग सांगितला आहे. संत रामदास म्हणतात, कुठलीही गोष्ट अशक्य नसते. एखादी गोष्ट जरी अशक्य वाटत असली तरी व्यवस्थित प्रयत्न केले तर ती गोष्ट आपण मिळवू शकतो. कुठलीही गोष्ट करत असताना सुरुवातीला ती कठीणच वाटत असते परंतु ती कठीण आहे म्हणून करण्याचे सोडून देणे हे कधीही योग्य नाही. सतत प्रयत्न करत राहिल्याने कठीण गोष्टी देखील सोप्या होतात. हाच विचार स्पष्ट करत असताना संत रामदासांनी वरील सुभाषित वापरले आहे. ते म्हणतात, वाळूच्या कानातून तेल येणे ही अशक्य गोष्ट आहे परंतु प्रयत्न केले तर तेही शक्य होईल.

कुठल्याही संकटाला न घाबरता सतत प्रयत्न केल्याने यश नक्की मिळते. आपण समाजात बघतो अनेक गरीब कुटुंबातील मुलं आपल्या प्रयत्नांच्या जोरावर  मोठे यश प्राप्त करतात. त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या असंख्य असतात, परंतु त्या अडचणींचा बागुलबुवा न करता धैर्याने त्यांना सामोरे गेल्यास यश प्राप्त होते. म्हणून आयुष्यात नेहमी प्रयत्न केले पाहिजे. कारण प्रयत्न करत राहिल्यास यश हमखास मिळते.

Similar questions