Online classes Ashik akrshk honysathi ani sampurn deshatil mulana Te ubaldh karun deta yave ysathi 5suchna suchava nibandh in Marathi
Answers
Answer:
सध्या भारतासह जगातील विविध देशांमध्ये तोरणाचे संकट कसले आहे अशा काळामध्ये सर्व लोक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मध्ये कोणीही घराच्या बाहेर पडू शकत नाही यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे असे की मेडिकल, किराणा स्टोअर आणि हॉस्पिटल. अशा परिस्थितीमध्ये सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झालेत. एवढेच नसून शाळा महाविद्यालय सुद्धा बंद झालेले आहेत.
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आणि शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे हा मार्ग शोधला. लॉक डाऊन मुळे अचानक झालेल्या शिक्षण प्रणालीतील बदल पाहून विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेले पण हळूहळू विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लर्निंगला आपल्यासच केलं.
ऑनलाइन लर्निंग तेव्हा ऑनलाईन क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या माध्यमांचा वापर करावा लागेल यासाठी विद्यार्थ्यांनी कुठली दक्षता घ्यावी याचे सर्व मार्गदर्शन करून या ऑनलाईन क्लासेस ला सुरुवात केलेली आहे.
त्या त्या काळानुसार माणसाची परिस्थिती बदलते आणि त्या काळाला अनुरूप असे जगणे आपण शिकून घेतो हे आपल्याला माहितीच आहे. त्याप्रमाणेच कोरोनाच्या महा संकटात सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काल विद्यार्थी शिकत होते तेच ज्ञान त्यांना आजही मिळाले पाहिजे यासाठी ऑनलाइन क्लासेस या सेवेची सुरुवात केलेली आहे.
आज शिक्षण क्षेत्रात सगळीकडे ई-लर्निंग, ऑनलाईन शिक्षण यांचे साम्राज्य पसरलेले आहे. आजच्या डिजिटल काळामध्ये शिक्षण सुद्धा डिजिटल रुपाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
” ई लर्निंग म्हणजेच वर्ग अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापण्यात येणारी आधुनिक शिक्षण प्रणाली होय. आपण इलेक्ट्रॉनिक एज्युकेशनल लर्निंग ( Electronic Educational Learning ) असे सुद्धा म्हणतात.”
लॉकडाऊन सारख्या महासंकटांमध्ये सुद्धा शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारे आणि विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत इतर नवीन ज्ञान देणारी आनंददायी शिक्षण प्रणाली म्हणजे ऑनलाईन क्लासेस आहे.
या ऑनलाईन क्लासेस किंवा ई-लर्निंग शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, डीव्हीडी, एलसीडी मॉनिटर इत्यादी साधने आवश्यक असतात.