India Languages, asked by snehasule, 7 months ago

online शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध​

Answers

Answered by sharmilasharma20507
10

Answer:

आता जूनमध्ये आपण सर्व मित्रमैत्रिणी एकत्र मिळणार

आणि कोरोनामुळे अचानक जाहीर झालेल्या काही

दिवसांच्या सुट्टीनंतर आपण पुन्हा शाळेत जाणे सुरु करणार

या आशेवर असतानाच अचानक एक बातमी कानावर

आली की कोरोना हया वायरसचा प्रभाव दिवसेंदिवस

वाढतच असल्यामुळे येणाऱ्या जून महिन्यातही शाळा सुरु

करता येणार नव्हती व त्याचा पर्यायी मार्ग म्हणून आमची

शाळा ही ऑनलाईन भरणार होती.

ऑनलाईन शाळा' हा शब्द जरी शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन असला तरी आम्हा सर्वांना त्याचे खूप कुतूहल ही होते. माझी शाळा आता ऑनलाईन भरणार होती.

अखेर जून महिन्यात माझी ऑनलाईन शाळा सूरु झाली. परंतु या वर्षी मात्र माझ्या शाळेचा पहिला दिवस जसा मागील वर्षी होता तसा नसून काहीसा वेगळा होता. मी शाळेचा गणवेश घातला होता. मी शाळेचे दप्तर ही जवळ घेतले होते परंतु मी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर न जाता तेच सर्व साहित्य घेऊन घरातच बसलो होतो आणि माझी ही अशी ऑनलाईन शाळा पूर्ण करण्यासाठी आजपासून मला साथ लाभणार होती ती माझ्या मोबाईलची. मोबाईलवे जसे दुष्परिणाम आहेत तसेच आज याच मोबाईलमुळे माझी ऑनलाईन शाळा भरणार होती हा त्याचा फायदा मला आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना झाला होता.

शाळेची वेळ झाली आणि मी माझा मोबाईल सुरु करून शाळेकडून मिळालेल्या लिंक वर क्लिक केले आणि क्षणार्थात माझी ऑनलाईन शाळा सुरु झाली. मोबाईल समोरच्या स्क्रीनवर माझ्या वर्गातील सर्व मुले आपापल्या घरून ऑनलाईन शाळा करण्यासाठी बसलेले मला दिसले.

पहिल्यादा काहीच कळत नव्हते की कोणते बटण दाबले की आपला आवाज इतरांना जातो, कोणते बटन दाबले की मी दिसतो किंवा दिसत नाही हे सगळ मी शिकू लागलो. काही वेळातच आमच्या वर्गशिक्षिका ही मला मोबाइलच्या स्क्रीन घर दिसू लागल्या. त्या उभ्या असलेल्या मागील बाजूस शाळेसारखाच एक फळा होता ज्यावर त्या आम्हाला आता शिकवणार होत्या.

माझी ही ऑनलाईन शाळा मोबाईलवर शिकण्याचा हा वेगळाच अलौकिक अनुभव होता. सर्व काही पूर्वीच्या शाळेसारखेच. तेच शिक्षक, तेच मित्र, तसाच फळा परंतु सर्व फक्त मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात राहून शाळा सुरु होती.

माझ्या हया ऑनलाईन शाळेत पूर्वीच्या शाळेसारखे सगळेच होते अगदी मधली सुट्टी ही होते परंतु जसे पूर्वी आम्ही मधल्या सुट्टीत एकमेकांबरोबर दंगा मस्ती करत असायचो तसे आता नाही करू शकत. आता मधल्या सुट्टीत आम्ही आपापल्या घरी बसून जेवतो. माझ्या या ऑनलाईन शाळेत एक तास संपला की घंटा वाजवायला कोणीही शिपाई काका नाहीत.

Similar questions