World Languages, asked by arbaz6929, 2 months ago

औक्षण poem appreciation marathi​

Answers

Answered by Kanagalakshmi201
2

HOPE IT HELP YOU...

PLEASE MARK AS BRAINLIEST ANSWER...

Attachments:
Answered by rajraaz85
0

कविता - औक्षण

कवयित्री -इंदिरा संत ह्या औक्षण या कवितेच्या कवयित्री आहेत आहेत.

कवितेचा रचना प्रकार - अष्टाक्षरी छंद असा आहे. काव्यसंग्रह इंदिरा संत यांची समग्र कविता.

कवितेचा विषय आहे -

सैनिकाच्या शौर्याचा गौरव करत असताना सामान्य भारतीयांच्या मनातील प्रतिक्रिया या कवितेत व्यक्त केलेल्या आहेत.

आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवर असणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. औक्षण या कवितेत कवयित्री सांगतात देशवासीयांच्या रक्षणासाठी आपले सैनिक जीवाची बाजी लावून सिमेवर लढत असतात. तेव्हा या जवानांसाठी सामान्य जनतेच्या डोळ्यातून सैनिकासाठी अश्रू ओघळतात.कवयित्री म्हणतात ते अश्रू नसून आसवांच्या ज्योती आहेत. या आसवांच्या ज्योतींनी सैनिकाला आम्ही ओवाळतो. तू सदैव चिरंजीवी रहा असे सैनिकाला म्हणतात. या डोळ्यातील ज्योतींनी सैनिकाचे औक्षण करतो. असे भाव कवयित्रींनी या कवितेत व्यक्त केलेले आहे.

औक्षण कवितेबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://brainly.in/question/25550851

https://brainly.in/question/38971391?

#SPJ3

Similar questions