Science, asked by PragyaTbia, 1 year ago

औष्णिक विद्युत निर्मिती आणी सौर औष्णिक विद्युत निर्मितीचा फरक स्पष्ट करा.

Answers

Answered by gadakhsanket
9
★उत्तर - औष्णिक विद्युत निर्मिती आणी सौर औष्णिक विद्युत निर्मितीचा फरक अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत.

औष्णिक विद्युत निर्मिती

१)कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली उष्णता ऊर्जा वापरून विद्युत निर्मिती केली जाते.
२)उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलारमध्ये केले जाते.
३)ज्वलनाच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर उच्च दाबाच्या वाफेत होते.या वाफेच्या शक्तीने टर्बाइन फिरते.त्यामुळे टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युतनिर्मिती होते.
४)औष्णिक विद्युतनिर्मिती प्रदूषणकारी आहे.
५)औष्णिक विद्युतनिर्मितीत वापरले जाणारे इंधन म्हणजे कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत.

सौर औष्णिक विद्युत निर्मिती

१)सूर्यकिरणांची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युतनिर्मिती केली जाते.
२)उष्णता निर्मितीसाठी सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्याची उष्णता मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केली जाते.
३)सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाइन आणि तारबाईनद्वारे जनित्र फिरवले जाते.व विद्युत ऊर्जा मिळवली जाते.
४)सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही.
५)सौर औष्णिक विद्युत निर्मितीत वापरली जाणारी सौर ऊर्जा अमर्यादित आणि शाश्वत आहे.

धन्यवाद...
Similar questions