औद्योगिक संयोगाची कारणे सांगा ?
Answers
Answer:
औद्योगिक संयोग : दोन किंवा अधिक उद्योगसंस्थांचा संघ. अशा उद्योगसंस्था एकाच किंवा भिन्न उद्योगांतील असतील व त्यांचे संयोगपूर्व संघटनात्मक स्वरूप वैयक्तित मालकी, भागीदारी किंवा संयुक्त भांडवलाच्या संस्था ह्यांपैकी कोणतेही असू शकेल. संयोग ही सापेक्ष कल्पना असल्यामुळे संयोगामुळे होणाऱ्या एक वटीच्या मर्यादा, स्वरूप व विस्तार ही सर्वच संयोगांबाबत एकच रूप धारण करतील असे नाही. विविध उद्योग संस्थांचे एकीकरण होऊन त्यांची एकच उद्योगसंस्था झालेल्या पूर्ण संयोगापासून, काही विशिष्ट बाबतींत एकसूत्री धोरण अवलंबिण्याचे मोघम करार असणाऱ्या परंतुसंयोगातील प्रत्येक उद्योगसंस्थेचे पृथकत्व शाबीत ठेवणाऱ्या ढिल्यासंयोगापर्यंत संयोगाच्या विविध छटा व रूपे असू शकतात.
उद्योगसंस्थांमध्ये दोन क्षेत्रांत स्पर्धा असू शकते. एक पक्क्या मालाच्या विक्रीत व दुसरी उत्पादनाला लागणाऱ्या कच्च्या व पूरक मालाच्या खरेदीत. साहजिकच आपसांतील अनिष्ट व हानिकारक स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या वरील आपत्तीतून मार्ग काढण्याकरिता व कच्च्या व पूरक वा पक्क्या मालाची किंमत स्पर्धायुक्त बाजारातील प्रवाहाकडून ठरविली जाण्याऐवजी तीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता उत्पादक संयोग स्थापिले जातात. अशा तऱ्हेने खरेदी वा विक्रीतील स्पर्धा कमी करून जास्तीत जास्त नफा मिळविणे, हा संयोग स्थापण्याचा एक प्रधान हेतू आढळतो.
वरील कारणांशिवाय संयोगांमागे इतरही अनेक प्रेरणा असतात. संयोगांच्यायोगे उद्योगसंस्थांचा आकार वाढून बाजार, भांडवल उत्पादन व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांतील बाह्य काटकसरींचा फायदा मिळतो व उत्पादन परिव्यय कमी होऊन नफा वाढतो. त्याशिवाय सामायिक हितसंबंध असलेल्या इतर अनेक प्रश्नांसंबंधी परस्परसल्ल्याने व एकोप्याने निर्णय घेणे, विधानसभा व लोकसभा वगैरे प्रातिनिधिक संस्थांमध्येउद्योगांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे, उद्योगातील घटकांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सामुदायिक रीतीने शैक्षणिक कार्यक्रम आखणे, आपसांतील स्पर्धेच्या स्वरूपाबाबत सर्वमान्य आचारसंहिता तयार करणे वगैरे अस्तित्वात येण्याची अनेक कारणे असू शकतात
Explanation:
Mark me as a brainliest