India Languages, asked by arjaveejain5132, 6 months ago

औदयोगिक शांततेला अहितकारक असणारा घटक कोणता?

Answers

Answered by altamashannupappuwal
0

Answer:

乇山Ҩフ卄ᘜ丂卂几フ|ㄖ..................

Answered by aryab674
0

Answer:

उद्योगधंद्याचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे उद्योजक व्यवस्थापन आणि कामगार व कामगार युनियन. वर वर दिसणारे हे दोन घटक वेगवेगळे नसून, एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. या दोघांच्या सहकार्याने औद्योगिक प्रगतीबरोबर औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्याकरिता सहाय्यभूत ठरू शकतात, पण दोन्ही बाजूकडून अवास्तव आणि तर्कसंगत मागणीअभावी त्यांच्यातील सुसंवाद कुठे तरी कमी पडायला लागलेला असतो किंवा कुठे तरी व्यवस्थापनाचे पण चुकीचे धोरण कारणीभूत असते. त्याकरिता या दोघांनी आपापली भूमिका म्हणजे ‘वर्कलाइफ’ पाळणे आवश्यक आहे.

औद्योगिक शांतता अबाधित ठेवायची असेल, तर दोघांनी परस्पर संबंध चांगले ठेवून सहकार्य भावनेतून उद्योग, शहर विकास, पर्यायाने देशहित कसे साधता येईल याची खबरदारी घेणे आवश्यक असते. उद्योजकाने आपला उद्योग-व्यवसाय भरभराटीस कसा येईल त्याकरिता सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक असते, तर त्या उद्योग व्यवसायात राबणारे हात म्हणजेच कामगार व कामगार युनियन यांचेदेखील तेवढेच सहकार्य मिळणे आवश्यक असते. उद्योजकाने नवनवीन संकल्पना, नवनवीन तंत्रज्ञान व मानव संसाधन यांचे योग्य व्यवस्थापन करून आपले नाव चांगल्या प्रकारे टिकवून ठेवता येईल याच प्रयत्नात राहिले पाहिजे. त्याच उद्योग व्यवसायात महत्त्वाची भूमिका कामगार आपल्या सहकार्यातून, तसेच सहभागातून प्रत्यक्षात नक्कीच उतरवू शकतात.

याच सहकार्याच्या भावनेतून चांगले औद्योगिक वातावरण निर्माण होऊन उद्योजक व्यवस्थापन आणि कामगार युनियन या दोघांमधील तेढ कमी होऊन उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे टिकवता येतो. सुदृढ औद्योगिक संबंधातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपापल्या शहरातील औद्योगिक, सामाजिक व आर्थिक बळ वाढविण्यास आणि त्यातूनच औद्योगिक शांतता अबाधित राखण्याकरिता नक्कीच हातभार लावू शकेल. गेल्या सहा ते सात दशकांपासून नाशिक औद्योगिक परिसर सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, वाडीवार्हे गोंदे (ईगतपुरी) एकामागे एक करीत विस्तारीत गेला. लहानमोठे साडेतीन हजारांवर उद्योग कार्यरत आहेत, पण गेल्या १४ वर्षात एकही मोठा उद्योग म्हणावा तसा या परिसरात उभा राहू शकला नाही.

त्यामुळे नाशिक परिसरातील औद्योगिक भरभराटीस ओहोटी लागल्यासारखे झाले आहे. औद्योगिक मूलभूत सुविधा, माफक वीजदर, कर कायदा यामधील क्लिष्ट कायदे, कामगार युनियन यामधील वादविवाद, राजकीय उदासिनता अशा वेगवेगळया कारणांनी नाशिक औद्योगिक परिसराला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश ,छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश यासारखे राज्यांनी नवनवीन उद्योगांनी त्यांच्याकडे यावे आणि तेथील लोकांना रोजगार उत्पन्न व्हावा याकरिता मुबलक जागा, वीज व करांमध्ये विशेष सवलती देऊ केलेल्या आहे. नाशिक परिसरातील औद्योगिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे चित्र दिसत आहे.

छोट्या-छोट्या, तसेच लहान कंपन्यांना मोठ्या कंपनीप्रमाणे कायदे पाळणे कठीण जाते किंवा तंतोतंत पालन करणे अवघड होऊन जाते. त्यामुळे छोट्या उद्योगातील व्यवसायातील कामगारांना किमान वेतनानुसार आर्थिक लाभाशिवाय कॅन्टीन, सेफ्टी साधने, वेळोवेळी प्रशिक्षण यासारख्या सवलती पुरवू शकत नाही. खरोखरच त्यांची तशी परिस्थिती आहे का? त्यांचा टर्नओव्हर पुरेसा आहे का? त्याचा होणारा उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यावर सगळे अवलंबून असते.

उद्योजकाला जर फायदा कमी-कमी होत असेल, तर तो उद्योजक आपल्या कामगारांना अशा सर्व किंवा काही सवलती कशा देऊ शकतील? या सर्व बाबींचा विचार करून कामगारांनी आपापल्या मागण्या उद्योजकासमोर ठेवल्यास समन्वयाने त्यातूनच सुवर्णमध्य साधून पर्याय काढून प्रथम उद्योग कसा चालू राहील हेच महत्वाचे ठरते. नाहीतर दोघांच्या आडमुठ्या धोरणामुळे अवाजवी, बेकायदेशीर मागण्यांमुळे मग उद्योजक आणि कामगार यामध्ये बेबनाव थोडक्यात खटके उडण्यास सुरुवात होते. याचा विपरीत परिणाम उद्योजकाला कंटाळून बंद करण्याचा उद्योग समोर उभा राहतो. या सर्वांमध्ये उद्योजकाचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण कामगाराला आपल्याच कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा करायचा हा यक्षप्रश्न समोर उभा राहतो. त्यामुळे सोशल-इकॉनॉमिकल इनबॅलन्स होतो. उद्योग बंदच झाला तर कामगारांना काम मिळेनासे होते. कामच नाही तर उत्पन्न कुठून येणार? कुटुंबाचा उदारनिर्वाह करणेच अवघड होऊन बसते. मुलाबाळांचे शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. अशा बिकट परिस्थितीतूनच मग काही लोक वाईट मार्गाला जायला भाग पडतात. गो स्लो, संप, बंड, मारामारीचे पर्यवसन खुनामध्ये घडू लागले.

अशा प्रकारे औद्योगिक शांतताच धोक्यात येऊ लागली. निपमच्या सहाय्याने निमा, आयमा, स्टाईस, लघुउद्योग भारती, कामगार युनियन आणि उद्योजक व्यवस्थापनातील वरिष्ठ मंडळी, औद्योगिक तज्ज्ञ या सर्वांनी मिळून बिघडलेल्या औद्योगिक अशांततेवर कसा तोडगा निघेल यावर विचारमंथन केले. यातून औद्योगिक संबंध कसे चांगले ठेवता येतील, त्याचाच परिणाम म्हणून काही अंशी औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यात मदत झाली. अशीच चर्चासत्रे वेळोवेळी झाली पाहिजेत. जेणेकरून नाशिक परिसरातील औद्योगिक वातावरण उद्योगांना पोषक करता येईल.

Similar questions