Sociology, asked by balajibharati371, 8 months ago

पंडित दिनदयाळ उपाध्याय याची मराठी भाषेत माहिती​

Answers

Answered by digvijay49
2

Answer:

Hope you like it

Explanation:

पंडित दीनदयाळ उपाध्याय (जन्म : मथुरा, २५ सप्टेंबर इ.स. १९१६; मृत्यू : ११ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.

११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये दीनदयाळ रिसर्च सेंटर आहे. त्याचे अध्यक्ष महेश शर्मा यांनी दीनदयाळांवर १४ पुस्तके लिहिली आहेत. दीनदयाळांच्या जीवनावर 'दीन दयाल एक युगपुरुष' नावाचा हिंदी चरित्रपट निघाला आहे. त्यात दीनदयाळांची भूमिका इमरान हशनी यांनी आणि तरुण दीनदयाळांची भूमिका निखिल पितळे यांनी केली आहे.

Similar questions