• पुढील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा :
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
रोझी मन लावून अभ्यास करीत होती. सभोवती सगळा वह्या-पुस्तकांचा पसारा होता. अभ्यास
करता-करता तिचे लक्ष तिच्या आवडत्या फिकट निळ्या रंगाच्या वहीकडे गेले. वहीच्या पानातून
मोरपिसाचे टोक डोकावत होते. तिने हातातले अभ्यासाचे पुस्तक मिटवले आणि .........
Hey guys answer beautifully
I will mark u as branliest
Answers
आपले उत्तर :-
_________________________________
➡️ पूर्ण कथा -
रोझी मन लावून अभ्यास करत होती. सभोवती सगळा वह्या-पुस्तकांचा पसारा होता. अभ्यास करता-करता तिचे लक्ष तिच्या आवडत्या फिकट निळ्या रंगाच्या वहीकडे गेले. वहीच्या पानातून मोरपिसाचे टोक डोकावत हाेते. तिने हातातले अभ्यासाचे पुस्तक मिटवले आणि त्या मोरपिसाकडे एकटक बघत राहिली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मागच्या वर्षी उन्हाळ्याची सुट्टीत आजोळी गेली होती. तिथला तो अचंबीत करताना निसर्ग आठवला.
रोझीला त्या हिरवळ वातावरणात पिसारा फैलावून नाचणारा मोर आठवला. ती तिची मोर पाहण्याची प्रथमच वेळ होती. त्या मोरा मागे ती पूर्ण शेतभर धावली परंतु त्याला स्पर्श करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. या सगळ्या गडबडीत काही मोरपंख मात्र जमिनीवर गळाले. ते मोरपंख तिने गोळा केले आणि घरी आल्यावर आठवण म्हणून मराठीच्या पुस्तकात दडपून ठेवले.
अचानक आईचा आवाज आला, "काय ग काय झालं?" आणि रोझी स्वप्नातून बाहेर येऊन पुन्हा अभ्यासाला लागली.
_________________________________
धन्यवाद...
Credit - Sanket sir.!
Answer:
hope this will help you