India Languages, asked by santoshlachhawani232, 4 months ago

पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
(1) मुठभर मांस चढणे (2) अंगावर सरसरून काटा येणे (3) पर्वणी असणे​

Answers

Answered by rajraaz85
30

Answer:

मुठभर मांस चढणे म्हणजेच आनंदाने फुलून जाणे किंवा खूप अभिमान वाटणे.

वाक्यात उपयोग-

१. अजय परीक्षेत राज्यात पहिला आल्याने आई-वडिलांच्या अंगावर मूठभर मांस चढले.

२. गरिबीची परिस्थिती असताना देखील परीक्षेचा निकाल बघून दिनेशच्या अंगावर मूठभर मांस चढले.

अंगावरून सरसरून काटा येणे म्हणजे खूप भीती वाटत नाही किंवा रोमांचित वाटणे.

वाक्यात उपयोग-

१. रस्त्याने जात असताना अचानक खूप मोठा साप पाया जवळून गेल्याने अंगावर सरसरून काटा आला.

२. समोरचे वाहन खूप जोरात जवळून गेल्याने अंगावर सरसरून काटा आला.

पर्वणी असणे म्हणजे उत्तम संधी असणे.

वाक्यात उपयोग-

१. लग्नकार्यातील पदार्थ बघून जेवणाची पर्वणीच आहे असे राजेशला वाटले.

Explanation

Similar questions