India Languages, asked by piyush00785, 6 months ago

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा : मुद्दे : निघणे पळवणे एक दूधवाला (गवळी) दुधात पाणी घालून विकणे श्रीमंत बनणे गावी जाण्यास वरती माकड वाटेत नदी दूधवाल्याने माकडाला दगड मारणे माकडाने एक एक नोट खाली फेकणे - - पाणी पिण्यास जाणे जमिनीवर तर काही नोटा पाण्यात फेकणे मनात विचार करतो, "पाण्याचा पैसा पाण्यात. - पैशाची पिशवी झाडाखाली ठेवणे काही नोटा जमिनीवर तर काही नोटा पाण्यात पडणे " hat pi - - पिशवी काही नोटा दूधवाला​

Answers

Answered by borhaderamchandra
102

Answer:

" पाण्याचा पैसा पाण्यात "

एका गावात एक लबाड दूधवाला राहत होता.

त्याचे नाव रामजी होते.

तो दुधात पाणी घालून विकायचा.

अशी लबाडी करून त्यांने खूप पैसे कमवले.

एके दिवशी रामजी दुसऱ्या गावाला जायला निघाला.

वाटेत नदी लागला. दमल्यामुळे

नदीकाठावरील झाडाखाली बसून शिदोरी खाल्ली आणि पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर गेला.

त्याचे सामान व पैशांची पिशवी तशीच झाडाखाली ठेवली.

त्याच झाडावर एक माकड होते.

त्याने रामजीला पाहिले. रामजी नदीकडे जाताच माकडाने खाली येऊन ती पैशांची पिशवी पळवली.

रामजी जेव्हा परत आला तेव्हा पिशवी जागेवर नाही पाहन इकडे-तिकडे शोधू लागला.

अचानक त्याचे लक्ष झाडावरील माकडाकडे गेले.

माकडाच्या हातात पैशांची पिशवी पाहिल्यावर ती मिळवण्यासाठी रामजीने माकडाला दगड मारायला सुरुवात केली.

मग माकडानेही पिशवी उघडून त्यातील नोटा फेकायला सुरुवात केली. त्यातील बऱ्याच नोटा वाऱ्यामुळे नदीच्या पाण्यात वाहून गेल्या.

रामजीची खोड मोडली.

पाण्याचा पैसा पाण्यात गेला.

तात्पर्य : लबाडी करू नये / दुसऱ्यांना फसवू नये

Answered by nilesh1naik1971
5

Explanation:

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा : मुद्दे : निघणे पळवणे एक दूधवाला (गवळी) दुधात पाणी घालून विकणे श्रीमंत बनणे गावी जाण्यास वरती माकड वाटेत नदी दूधवाल्याने माकडाला दगड मारणे माकडाने एक एक नोट खाली फेकणे - - पाणी पिण्यास जाणे जमिनीवर तर काही नोटा पाण्यात फेकणे मनात विचार करतो, "पाण्याचा पैसा पाण्यात. - पैशाची पिशवी झाडाखाली ठेवणे काही नोटा जमिनीवर तर काही नोटा पाण्यात पडणे " hat pi - - पिशवी काही नोटा दूधवाला

Similar questions