पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. कथेला शीर्षक दया. व तात्पर्य लिहा.
मुद्दे : एक मुलगा - नदी - पोहणे - बुडणे - गुराखी - नदीत उडी - मुलगा वाचणे-
कौतुक.
Answers
मुलाचे कौतुक
एक रामू नावाचा मुलगा होता , तो कोल्हापूर गावामध्ये राहत होता . उन्हाळ्याचे दिवस होते , तो नदीकाठी पोहायला जातो . तो नदीत उतरत असताना त्याचा पाय घसरतो आणि तो अचानक बुडतो, तो जोरजोरात ओरडायला लागतो वाचवा , वाचवा . तेथे एक गुराखी असतो , तो रामू कडे बगतो आणि तो नदीत उदी मरतो , तो मुलगा रामूला वाचवतो . तोपर्यंत तेथे लोक जमा होतात आणि ती लोक त्या मुलग्याचे कौतुक करतात .
तात्पर्य :- दुसऱ्यांची मदत केली पाहिजे .
Explanation:
please mark me as brainlist
सहासी गुराखी
एकदा एका गावात नदीला खूप मोठा पूर आलेला होता. गावातील मुले नेहमी नदीवर जाऊन पाण्यात पोहत असत. असाच एक मुलगा नदीवर आला आणि पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही कारण त्याला वाटले नेहमीसारखेच पाण्याची पातळी कमी असेल म्हणून त्याने कुठलाही विचार न करता पाण्यात उडी मारली.
नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याची पातळी खूप वाढली होती आणि उडी मारल्यानंतर ते मुलाच्या लक्षात आले. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी येतो जोरजोरात हात पाय हलवू लागला परंतु त्याचे प्रयत्न कमी पडत होते. तो पाण्यात बुडत होता म्हणून जोराने वाचवा वाचवा असा आवाज देवू लागला. जवळच एक गुराखी आपले गुर चारत होता त्याने या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. कुठल्याही गोष्टींचा विचार न करता त्या गुराख्याने पाण्यात उडी मारली. व त्या मुलाला वाचवण्याचा तो प्रयत्न करू लागला. अथक प्रयत्नानंतर मुलाचे प्राण वाचविण्यात तो यशस्वी झाला व त्याने मुलाला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले.
थोड्या वेळानंतर संपूर्ण गावात ही बातमी पोहोचली व गावातील प्रत्येक जण त्या गुराख्याचे कौतुक करू लागला. मुलाच्या आई वडिलांनी देखील नदीकडे धाव घेतली आपला मुलगा सुखरूप आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी गुराख्याचे कौतुक केले . संपूर्ण गावातून त्या गुराख्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. त्या गुराख्याला सरपंच यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
गोष्टीचे तात्पर्य -कुठल्याही परिस्थितीत आपण इतरांची मदत केली पाहिजे.