(७) पुढील मुद्द्यांतील घटक तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा :SHALECHE MANOGAT
1 .अपघाताची खंत ,
2.स्वागत,
3.शाळेचे,
4.बोलक्या भिंती ,
5 मुलांची गडबड,
6.खेळाचे सामने,
7.हिरवागार परिसर ,
8.विज्ञान प्रदर्शन.
Answers
Explanation:
शिक्षण हि माणसाची मूलभूत गरज आहे. माणसाकडे रूप, धन, सर्व काही असेल पण शिक्षण नसेल तर सर्व व्यर्थ आहे. शाळा हा आपल्या शिक्षणाचा प्रमुख आणि अविभाज्य घटक आहे. एक लहान मूळ शाळेत जाते पण शाळेतून बाहेर पडतो तो सुशिक्षित आणि जबाबदार व्यक्ती म्हणून बाहेर पडतो. अनेक यशस्वी व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेला आणि शिक्षकांना दिले आहे. अनेकांनी शाळेचे तोंडभरून कौतुक केले आहे. पण कधी कोणी हा विचार केला आहे का कि हि आपली सुंदर शाळा, हिच्या मनात काय चालले असेल. शाळा बोलू लागली तर? शाळेला तिचे आत्मवृत्त, मनोगत व्यक्त करावेसे वाटले तर? काय होईल?
काळजी करू नका. ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे आम्ही ह्या लेखामध्ये दिली आहेत. एका शाळेचे मनोगत कसे असेल हे आम्ही ह्या निबंधातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा निबंध तुम्हाला तुमच्या शाळेतील गृहपाठामध्ये तसेच भाषणासाठी मदत करेल. हा निबंध “शाळा बोलू लागली तर”, “शाळेचे मनोगत”, “शाळेचे आत्मवृत्त” अशा विषयांसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.
एका शाळेचे आत्मवृत्त, मनोगत मराठी निबंध, भाषण, लेख
मी एक शाळा बोलतेय. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील मुठा गावातील. पण आज माझ्या एका विद्यार्थ्यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज अनेक मोठी माणसे या गावात आली आहेत. एवढा थाटमाट कशासाठी? अहो, माझ्या विश्वास नावाच्या सुपुत्राने मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली आहे. यंदाच्या शालान्त परीक्षेत सर्व विभागातून माझा ‘विश्वास मोरे’ हा विद्यार्थी प्रथम आला आहे.
काल दुपारी ही बातमी गावात सगळीकडे पसरली तेव्हापासूनच गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज सकाळीच अधिकृत रीतीने परीक्षेचा निकाल घेऊन महाराष्ट्र शालान्त परीक्षा मंडळाचे अधिकारी गावात आले. तेव्हा विश्वास आपल्या वडिलांच्या एका छोट्याश्या गॅरेजमध्ये त्यांच्यासोबत काम करत होता. तो शाळेतील अत्यंत गुणी व हुशार मुलगा होता. आपला विश्वास हा खूप हुशार आहे, याची त्याच्या आईवडिलांना, त्याच्या गुरुजींना कल्पना होती. तरीपण विश्वास एवढे प्रचंड यश मिळवेल अशी कुणाला कल्पनाही नव्हती. अशा या माझ्या विश्वासामुळेच मी आज दूरदर्शनवर झळकले. मराठी निबंध लेखन, संग्रह, विषय
ज्याप्रमाणे आज मी या माझ्या सर्व गुणी व हुशार विद्यार्थ्यांमुळे दूरदर्शनवर झळकले. छोटी मूर्ती मोठी कीर्ती, या म्हणीप्रमाणेच असेच गुणी विद्यार्थी मला भेटत गेले. याचे सारे श्रेय जाते ते माझ्या जन्मदात्याकडे मामासाहेब मोहोळ यांच्याकडे. संपूर्ण गावातील लोक त्यांना मामा म्हणून ओळखतात. शहरात प्रकृती ठीक राहत नव्हती. म्ह्णून ते गावाकडे आले. पण त्यांना स्वस्थ कसले बसवते. गावात त्यावेळी एकही शाळा नव्हती. शाळा नाही हे पाहून ते अस्वस्थ झाले. गावातील मुले तीन-चार किलोमीटर अंतर चालत दुसऱ्या गावात शाळेसाठी जात. त्यामुळे त्यांनी स्वतःच शाळा सुरु केली. यामध्ये त्यांना त्यांच्या भावाची मदत मिळाली. सर्व तयारी करून जून महिन्यामध्ये माझा जन्म झाला. माझी शाळा निबंध मराठी, भाषण, कविता
सुरुवातीला मामांच्या घरातील दोन खोल्यांचा माझ्यासाठी उपयोग केला जात असे. त्यानंतर काही दिवसांनी गावातील तुकाराम आप्पांची मामांना मदत मिळाली. मामांच्या या महान कार्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचीही खूप मदत मिळाली. माझ्या अंगणामध्ये बसून कुटुंबीय मुलांना ज्ञानाचे धडे देत असत आणि मुलेही अगदी उत्साहात शिकत होती, शाळेत येत होती. अगदी पहिलीपासून ते चौथीपर्यंत अभ्यास चाले. मामांची गावामध्ये तालीम सुद्धा होती. जवळच माझ्याच पटांगणाच्या शेजारी.
दोन चार वर्षातच मामांनी सरकारी पातळीवर प्रयत्न करून मोठी प्रशाला उभारण्याची अनुमती मिळवली. मग जागेची आवश्यकता निर्माण झाली. मामांनी स्वतःचे पैसे घातले. गावकऱ्यांनीही मदत केली. ग्रामपंचायतीनेही आपली जबाबदारी उचलली आणि आजची ही टुमदार इमारत उभी राहिली. पाहता पाहता मला प्रशालेचे स्वरूप प्राप्त झाले. नवीन शिक्षक नेमले. सर्वांनी भरपूर कष्ट घेतले. गावातील मुले आनंदाने नवीन शाळा या एका उत्साहात शाळेत येऊ लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आणि आजचे हे यश पाहायला मिळाले. मराठी निबंधाचे प्रकार, निबंध कसा लिहावा, कसा असावा?
काही दिवसांनी येथे रात्र शाळाही सुरु करण्यात आली. यामध्ये मुले दिवसभर काम करून रात्री माझ्या परिसरामध्ये ज्ञानाचे धडे घेत असत. गावात साक्षरतेचे प्रमाण वाढले. गावातील मोठी माणसेही शेतीच्या कामांमधून वेळ काढून शिक्षण घेतात. माझे नामकरण करण्याची वेळ आली तेव्हा सर्वांना वाटत होते की मामांचे नाव द्यावे. त्यानंतर सर्वांच्याच इच्छेनुसार मला मामांचे नाव देण्यात आले. ‘मामासाहेब मोहोळ प्रशाला’ असे माझे नामकरण करण्यात आले. आता लवकरच माझा रौप्यमहोत्सव साजरा होणार आहे.
माझ्याकडे शिकलेले अनेक विद्यार्थी शहरात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि ते सर्वजण मिळून अजूनही माझ्या या परिसरात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. शिबिराचे आयोजन करतात. स्वतः शाळेतील मुलांच्या मदतीने माझी संपूर्ण स्वच्छता करतात. आणि शाळेतील मुलांना झाडे लावण्यास सांगतात. शाळेतील बागेची काळजी घेण्यास सांगतात. महिन्यातून एकदा तरी माझे हे माजी विद्यार्थी माझी भेट घेतात. माझ्या देखभाल दुरुस्तीसाठी मदत करतात. ते आता माझ्यासाठी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने दुसरी मोठी इमारतदेखील बांधणार आहेत. मला गावाचे वैभव मानले जाते.
Hope this will help you
Thanks