Hindi, asked by herogaikwad, 7 months ago

पुढील मुध्यांच्या आधारे दिलेरणा विषयावर से po
शदान निबंध लिहा
संगणका
आत्मकथन​

Answers

Answered by kalpesh1532k
0

Explanation:

संगणकाचा एक छानसं चौकोनी कुटुंब होतं. त्यात आई-वडिल आणि दोन मुलांचं हे कुटुंब अगदी सुखाने राहत होतं. एक मुलगा तर एक मुलगी. मुलगा नोकरी करणारा तर मुलगी कॉलेजला जाणारी. बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामात अडकलेले. घरातील सर्व कामं आईलाच करावी लागतात. त्याचबरोबर बाकीचे तिघे त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न असल्याने आईला फार कंटाळा येऊ लागे. जेव्हा कधी वेळ मिळेल, तेव्हा घरी आल्यावरही बाबा, मुलगी आण‌ि मुलगा तिघांचं लग्न संगणक आणि मोबाइलमध्येच मग्न. हे सगळं पाहून एक दिवस आईला खूप खूप राग आला. ‌ती संगणकाच्या खोलीत गेली आणि त्याला म्हणाली, 'काय रे तू? किती वैताग आणलायस मला. या घरात सगळे तुझ्याशीच सतत बोलत राहतात. माझ्याशी बोलायला कुणालाच वेळ नाही. तू नसतास तर फार बरं झालं असतं.' आईचं बोलून होतंय तोच संगणकातून काहीतरी आवाज येऊ लागला. आता याला काय झालं? हे पाहायला आई संगपणाजवळ गेली. पाहते तो काय? चक्क हा संगणकच बोलत होता. तो म्हणाला, ‘मावशी इतक्या का चिडता? अहो, आज मी आहे म्हणून जगातील सगळी कामं पटापट होत आहेत. सगळे देश एकमेकांशी अगदी सहजतेने जोडले आहेत. माझ्यामुळे दूरदेशी राहणा-या आपल्या नातेवाईकाशी तुम्ही बोलू शकता. त्यांना तुम्ही बघू पण शकता. त्यामुळे सर्वांना किती छान वाटतं. मुले घरी बसून ऑफीसची कामे करू शकतात. घरच्याघरी तुम्हाला माझ्यामुळे सर्व प्रकारची माहिती मिळते. सर्व प्रकारच्या सहलीची, हॉटेल्सची बुकींग तुम्ही घरी बसून करू शकता. बँकेची कामं, ब‌लिे भरण्याची कामं माझ्यामुळे चुटकीसरशी होतात. फावल्या वेळात तुम्ही माझ्यासोबत खेळही खेळू शकता. सिनेमे बघू शकता. असं असताना तुम्ही का चिडता? माझ्यामध्ये कितीतरी माहिती साठविली जाते. त्यामुळे कागदाची, झाडांची बचत होते. कागदपत्रं सांभाळायची जागाही वाचते. मावशी, प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे असतात. पण लोकांनी माझा वापर कसा आणि किती करावा हे त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्ही प्लीज माझ्यावर नका ना चिडू.’ हे बोलणं ऐकल्यावर आईही शांत झाली. तिचं विचारचक्र सुरु झालं. तिला या संगणकबुवाचं म्हणणं पटू लागलं. मग आईनेही एक निश्चय केला. तिनेही संगणक शिकून घ्यायचं ठरवलं. ती मुलांकडून शिकू लागली. आईला शिकताना पाहून मुलंही खूष झाली.

Similar questions