•पुढील निवेदन वाचा आणि शाळेतील स्वातंत्र्यदिन समारंभाचा वृत्तान्त लिहा :
बातमीलेखन : (50 ते 60 शब्द)
सर्व जनतेला हार्दिक निमंत्रण!!
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा
प्रमुख पाहुणे : डॉ. नंदिनी देशमुख
(पर्यावरण तज्ज्ञ)
स्थळ : ना. जगन्नाथ शंकरशेट शाळा, गिरगाव, मुंबई.
Answers
Answer:
ना.जगन्नाथ शंकर शेट शाळा गिरगाव, मुंबई येथे स्वातंत्र्य दिवस साजरा
मुंबई, १६ ऑगस्ट: शहरातील गिरगाव परिसरातील ना.जगन्नाथ शंकर शेट शाळा येथे काल स्वातंत्र दिवस समारंभ अतिशय आनंदात पार पाडण्यात आला. १५ ऑगस्टला सकाळी सात वाजताच सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रांगणात जमा झाले. सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अतिशय सुंदर अशा पोशाखात रांगेत उभे राहिले. माननीय मुख्याध्यापक श्री दीपक सर यांनी प्रमुख अतिथी डॉक्टर नंदिनी देशमुख यांचे स्वागत केले व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या नंदिनी देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण करून दिली. देशासाठी आपण काय काय करू शकतो याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर काही शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला श्री पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण केला. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.
Answer:
5. (आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
(1) जाहिरातलेखन (50 ते 60 शब्द)
• पुढील शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करा :
छज्या, किफायतशीर, टिकाऊ, विविध आकारांत, सर्वांसाठी.