*पुढील ओळीतील रस ओळखा- ' हाकेतून हद्दपार होतेय आई , हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई*
1️⃣ करुण रस
2️⃣ शांत रस
3️⃣ वीर रस
4️⃣ बीभत्स रस
Answers
Answer:
veer rush is the answer
Answer:
करुण रस
Explanation:
कवी सतीश काळसेकर यांची मी वाचवतोय अतिशय सुंदर कविता आहे . या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या मनात असलेले दुःख किंवा करुणा ते व्यक्त करतात.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि मानवाच्या अपेक्षांमुळे खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यांत्रिक प्रगतीमुळे जुन्या काळात असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये बदल होत चालला आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेली मूल्य, संस्कार, नीति यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यातून चालण्यातून ते स्पष्ट जाणवत आहे असे कवि म्हणतात .
मुले देखील नेहमीप्रमाणे आपल्या आईला आई म्हणत नाही तर त्याची जागा मम्मीने घेतली आहे तसेच गोठ्या देखील आता गाय हंबरतांना दिसत नाही अशी खंत कवी व्यक्त करतात .
प्रस्तुत कविता ही करुण रसाचे उदाहरण आहे. कारण कवितेच्या माध्यमातून कवीच्या मनातील खंत, दुःख व्यक्त होताना दिसते. अतिशय हृदयद्रावक भावना व्यक्त होताना दिसतात.