India Languages, asked by bhagatvishnu595, 1 month ago

* पुढील प्रसंगावरून गोष्ट तयार करा.
शाळा सुटली होती. मोहन घरी आला होता. आई घरचं काम करत होती...​

Answers

Answered by prabhasaragada
3

Answer:

Hope its helpful!

Explanation:

plz mark as brainliest answer!

Attachments:
Answered by mad210216
0

कथा लेखन.

Explanation:

  • शाळा सुटली होती. मोहन घरी आला होता. आई घरचं काम करत होती.
  • मोहनने आईला हाक मारली व एक ग्लास पाणी आणायला सांगितले. आई पाणी घेऊन आली व तिने मोहनचा चेहरा पाहिला.
  • मोहन नाराज दिसत होता. आईने त्याला विचारले, "बाळा, काय झाले? तू नाराज दिसतोस." हे ऐकून मोहन जोरजोरात रडू लागला.
  • आईने त्याला तिच्याजवळ घेतले व त्याला शांत केले आणि त्याला नाराज व्हायचे कारण विचारले. तेव्हा मोहन म्हणाला,"आई आज परीक्षेचे गुण कळले. मला माझ्या सगळ्या मित्रांपेक्षा खूप कमी गुण मिळाले आहेत. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत आहे."
  • आई म्हणाली, "मोहन, तू या गोष्टीचे इतके वाईट वाटून नको घेऊस. या परीक्षेत तुला कमी गुण मिळाले आहेत, पण जर तू मेहनत करून अभ्यास केलेस तर पुढच्या परीक्षेत चांगले गुण मिळवू  शकणार"
  • मोहन आईला म्हणाला, "पण आई, मी तर परीक्षेसाठी खूप मेहनत केली होती. मला तर वाटले होते की मला सगळ्यात जास्त गुण मिळणार".
  • आई म्हणाली, "मोहन, आयुष्यात आपण जसे विचार करतो तसेच होत नाही. कधी कधी वाईट गोष्टी आयुष्यात घडतात. पण, आपण त्यांच्याबद्दल न विचार करता भविष्यात चांगल्या गोष्टी कशा करता येतील, याचा विचार केला पाहिजे."
  • मोहनला आईचे म्हणणे पटले. त्याने नैराश्य सोडून दिले व तो खुश झाला.
  • तात्पर्य: जीवनात एखादे वाईट प्रसंग घडल्यास आशा नाही सोडली पाहिजे.
Similar questions