पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
1) सागरजलाच्या तापमानातील भिन्नतेचा विस्तृत आढावा घ्या
Answers
Explanation:
तापमान हा सागरजलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सागरजलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ता कडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान २५°से.,मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६°से., तर ध्रुवीय प्रदेशात २°से. पर्यंत असते. याशिवाय सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्री वादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता,प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ॠतू इत्यादींचाही परिणाम दिसून येतो .सागरी प्रवाहाचासुद्धा सागरजलाच्या तापमानावर परिणाम होतो . ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, त्या भागात सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागरजलाचे पृष्ठीय तापमान वाढते.
hope it will help you
plz mark me as brainlist