India Languages, asked by samudremayur81, 1 month ago

पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दात उत्तर लिहा.

मोबाईलचे फायदे व तोटे लिहा.

answer quickly and spam answer will be reported​

Answers

Answered by manasi3151
80

Answer:

मोबाइल चे फायदे

१)हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो । जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता ।

२)मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यां पर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात ।

३) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे । तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।

४) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता । तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता ।

मोबाइल चे तोटे / दुष्परिणाम

१) मोबाइल च्या अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे । पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत । हल्ली घरातील आई वडील आणि मुले आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात बोलणे कमी झाले आहे ।

२) शाळा कॉलेज मधील मुले मोबाईल चा गैरवापर करताना पाहायला मिळते । मुले शाळेत तासाला बसून मोबाईल चा वापर करतात । ह्या मुळे मुलां मध्ये आत्मकेंद्री पणा वाढताना दिसत आहे ।

Similar questions