• पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (1) मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम झाले आहेत?
Answers
Answer:
Answer:
पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल तर तो मानव . त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला . मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला . एखाद्या व्यक्तीकडून का समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रति नेहमी कृतज्ञ राहतो , कधीही कृतघ्न होत नाही . हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही . त्यामुळे आज ' पर्यावरण वाचवा ' यासारखे वाक्ये कानी पडत आहेत .
Answer:
मानवाने निसर्गाचा अमाप उपयोग करून घेतला आहे. त्याच उपयोगामुळे आज निसर्गावर संकट आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे आज पृथ्वीवर प्रदूषण खूप वाढले आहे. त्यात ध्वनि प्रदूषण, जल प्रदूषण, वायु प्रदूषण इत्यादी प्रकारचे प्रदूषण वाढले आहेत.
मानवी हस्तक्षेपामुळे आज पृथ्वीवर झाडांची संख्या कमी झाली आहे. पृथ्वीवर झाडे किंवा जंगले कमी असल्यामुळे जमिनीची धूप होणे, पाऊस कमी पडणे इत्यादी महत्त्वाच्या समस्या उद्भवत आहे. जंगल तोडीमुळे भरपूर पक्षी व प्राण्यांचा नायनाट होऊ लागला.