History, asked by 910321883722, 2 months ago

पुढील प्रश्नाये सविस्तर उत्तर लिहा.
वाढत्या भ्रष्टाचाराचे देशावर होणारे परिणाम स्पष्ट करा ?


Answers

Answered by pappi17071983
16

Answer:

please mark me brainliest

Explanation:

भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे अनेक क्षेत्रांत अपात्र व्यक्ती पुढे येत आहेत. त्याचा व्यवस्थेवर, सार्वजनिक धोरणांवर तसेच गोरगरिबांवर विपरीत परिणाम होत आहे,’ असे मत प्राप्तिकर विभागाचे महासंचालक उज्ज्वल चौधरी यांनी नुकतेच व्यक्त केले.

‘सिम्बायोसिस लॉ स्कूल आणि पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’तर्फे (पीसीजीटी) आयोजित माजी केंद्रीय सचिव बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ‘पीसीजीटी’चे अध्यक्ष एस. सी. नागपाल, लॉ स्कूलच्या संचालिका डॉ. शशिकला गुरुपूर, ‘पीसीजीटी’चे सदस्य सत्यबीर दोद या वेळी उपस्थित होते.

‘काही वेळा सरकारचे धोरण ठरवताना नागरिकांची मते विचारात घेण्यात येतात. परंतु, त्याचा प्रत्यक्ष धोरणांमध्ये वापर होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात याविषयी संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सरकारने विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक आहे. यंत्रणा ही शिक्षा वाटता कामा नये, अशा प्रकारचे बदल करणे गरजेचे आहे. कोण काय काम करतो, कसे निर्णय घेतो, यावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा असली पाहिजे. कोणत्याही कामाचा परवाना, कागदपत्रे किंवा अन्य गोष्टींसाठी विकेंद्रीकरणाबरोबरच अत्यंत कडक कार्यपद्धती असली पाहिजे. असे झाल्यास सत्तेचा किंवा अधिकाराचा गैरवापर होणार नाही,’ असेही चौधरी यांनी सांगितले.

भ्रष्टाचार थांबवणे आपल्याच हाती आहे. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कायदे आणि कार्यपद्धतीबाबत नागरिकांना सखोल माहिती दिली गेली पाहिजे. त्यामुळे योग्य पद्धतीने काम न केल्यास सरकार काही करेल, अशी अपेक्षा त्यांना ठेवता येणार नाही.

Answered by inamdarka85
2

Answer:

1) भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाढत्या भ्रष्टाचाराने अनेक क्षेत्रात अपात्र व्यक्ती पुढे येत आहेत. त्यांचा व्यवस्थेवर सार्वजनिक धोरणांवर तसेच गोरगरिबांवर विपरीत परिणाम होत आहे असे मत प्राप्तिकर विभागाचे सरसंचालक उज्वल चौधरी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे .२) सिंबायोसिस लॉ स्कूल पब्लिक स्कूल कन्सरनन्स फॉर गव्हर्नर्स तर्फे आयोजित माजी केंद्रीय सचिव बी.जी. देशमुख स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सिंबायोसिस संस्थापक डॉक्टर.शा.ब. मुजुमदार पीसीजीटीचे डॉक्टर. शशिकला गुरुकुल पीसीजीटीचे सदस्य सत्य वीर यावेळी उपस्थित होते.

Explanation:

३) काही वेळा सरकारचे धोरण ठरताना नागरिकांची मते घेण्यात येतात. त्याचा प्रत्यक्ष दोन मध्ये वापर होत नाही. नागरिकांच्या मनात याविषयी समग्र निर्माण होतो. त्यामुळे सरकारने विश्वासहर्ता निर्माण करणे. यंत्रणा ही शिक्षा वाटत का कामा नये. अशा प्रकारचे बदल करणे गरजेचे आहे.४) भ्रष्टाचार थांबवणे आपल्या हाती आहे. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कायदे आणि कार्यपद्धतीबाबत नागरिकांना सखोल माहिती दिली गेली पाहिजे. त्यामुळे योग्य पद्धतीने काम न केल्यास सरकार काही करेल अशी अपेक्षा त्यांना ठरतात येणार नाही

Similar questions