पुढील संकल्पनाचित्र तयार करा.
परराष्ट्र धोरण निश्चित
करणारे घटक
Answers
परराष्ट्रीय धोरण: प्रत्येक राज्य आपणास इष्ट असलेले वर्तत इतर राज्यांनी करावे, यासाठी आपल्या मर्यादित प्रभावाचा विविध स्वरूपांत वापर करून त्या त्या राज्यातील राज्यकर्त्यांचे मनवळविते, यालाच स्थूलमानाने परराष्ट्रीय धोरण म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकात राष्ट्रवादाच्या उदयानंतर प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र असावे, हे तत्त्व सर्वमान्य झाले. जगातील अशा स्वतंत्र राष्ट्रांच्या परस्परसंबंधास आकार लाभून त्यातून एका आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे रूप निर्माण झाले. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्यामुळे इतर राज्यांशी आपले संबंध निश्चित करण्याच्या गरजेतून त्यास आपले परराष्ट्रीय धोरण ठरवावे लागते. ‘धोरण’ या शब्दातून पूर्व-नियोजनाचा अर्थ ध्वनित होतो; परंतु अंतर्गत क्षेत्रातील आर्थिक किंवा सामाजिक धोरणापेक्षा परराष्ट्रीय धोरणाचे स्वरूप वेगळे असते.