पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही
(२) शेतीचे व्यापारीकरण
(३) इंग्रजांची आर्थिक धोरणे
Answers
Answer: १.मुलकी नोकरशाही- एखाद्या मुलखातील किंवा प्रदेशातील जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जी व्यवस्था असते तिला 'मुलकी नोकरशाही' असे म्हणतात.
२. शेतीचे व्यापारीकरण- शेतीमध्ये अन्नधान्यासारखी जनतेच्या मूलभूत गरजेची पिके न घेता कापूस, नीळ अशी बाजारात अधिकाधिक नफा देणारी नगदी पिके घेण्याच्या पद्धतीला 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात. शेतीचे व्यापारीकरण हा ब्रिटिशांच्या अर्थविषयक धोरणाचा एक भाग होता.
३. इंग्रजांची आर्थिक धोरणे- भारतासारख्या वसाहतींमधून कच्चा माल कमीत कमी किंमतीत युरोपियन कारखान्यांंना पुरवायचा आणि तेथे तयार होणारा पक्का माल जास्तीत जास्त नफ्याने वसाहतीच्या बाजारपेठेत विकायचा, या सर्वांंसाठी होणारा खर्च हा वसाहतींमधील लोकांकडून वसूल करायचा असे इंग्रजांचे आर्थिक धोरण होते.
Explanation:
Answer:
१.मुलकी नोकरशाही- एखाद्या मुलखातील किंवा प्रदेशातील जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जी व्यवस्था असते तिला 'मुलकी नोकरशाही' असे म्हणतात.
२. शेतीचे व्यापारीकरण- शेतीमध्ये अन्नधान्यासारखी जनतेच्या मूलभूत गरजेची पिके न घेता कापूस, नीळ अशी बाजारात अधिकाधिक नफा देणारी नगदी पिके घेण्याच्या पद्धतीला 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात. शेतीचे व्यापारीकरण हा ब्रिटिशांच्या अर्थविषयक धोरणाचा एक भाग होता.
३. इंग्रजांची आर्थिक धोरणे- भारतासारख्या वसाहतींमधून कच्चा माल कमीत कमी किंमतीत युरोपियन कारखान्यांना पुरवायचा आणि तेथे तयार होणारा पक्का माल जास्तीत जास्त नफ्याने वसाहतीच्या बाजारपेठेत विकायचा, या सर्वांसाठी होणारा खर्च हा वसाहतींमधील लोकांकडून वसूल करायचा असे इंग्रजांचे आर्थिक धोरण होते.