२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही
(२) शेतीचे व्यापारीकरण
(३) इंग्रजांची आर्थिक धोरणे
Answers
Answer:
१.मुलकी नोकरशाही- एखाद्या मुलखातील किंवा प्रदेशातील जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जी व्यवस्था असते तिला 'मुलकी नोकरशाही' असे म्हणतात.
२. शेतीचे व्यापारीकरण- शेतीमध्ये अन्नधान्यासारखी जनतेच्या मूलभूत गरजेची पिके न घेता कापूस, नीळ अशी बाजारात अधिकाधिक नफा देणारी नगदी पिके घेण्याच्या पद्धतीला 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात. शेतीचे व्यापारीकरण हा ब्रिटिशांच्या अर्थविषयक धोरणाचा एक भाग होता.
३. इंग्रजांची आर्थिक धोरणे- भारतासारख्या वसाहतींमधून कच्चा माल कमीत कमी किंमतीत युरोपियन कारखान्यांना पुरवायचा आणि तेथे तयार होणारा पक्का माल जास्तीत जास्त नफ्याने वसाहतीच्या बाजारपेठेत विकायचा, या सर्वांसाठी होणारा खर्च हा वसाहतींमधील लोकांकडून वसूल करायचा असे इंग्रजांचे आर्थिक धोरण होते
Answer:
(१). मुलकी नोकरशाही :
इंग्रजांना भारतामधे आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज जाणवली. लॉर्ड कॉर्नवालिस त्यांनी ही गरज लक्षात घेता लोकशाही पद्धती तयार करून ती अंमलात आणली. मुलकी नोकरशाही इंग्रजांच्या शासन व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण भाग बनला. कंपनीमध्ये काम करणार्या अधिकार्यांना अनेक नियम लागू केले , अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये. यासाठी त्यांना पगारवाढ पण करण्यात आली.
इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी ताब्यातील प्रदेशाची जिल्हे वार विभागणी करून जिल्हाधिकार्यास शासनाचा प्रमुख बनविले.महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची महत्वपूर्ण कार्य. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची भरती केली जाऊ लागली.
(२). शेतीचे व्यापारीकरण :
पूर्वी शेतकरी घरातील गरजेनुसार अथवा गावातील वापर यासाठी अन्नधान्य पिकवत असे. शेतकरी मूलभूत गरजा यासाठी अन्नधान्य न पिकवता नगदी पीक घेण्यासाठी भर देऊ लागले जसे - कापूस, नीळ, तंबाखू, चहा इ.
त्या प्रक्रियेला ‘शेतीचे व्यापारीकरण’ असे म्हणतात.
(३). इंग्रजांची आर्थिक धोरणे :
औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही पद्धती रूढ झाली. व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. यामध्ये भलेही भारतीयांचे हाल व शोषण झाले परंतु त्याचा आर्थिक फायदा इंग्रजांना झाला.