पुढील समस्ये वर उपाय सुचवा. शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे
Answers
Explanation:
न घरे बांधून देतील अशा विकासकांना विश्वासात घेतले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला परवडेल अशा किमतीत जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी निश्चित धोरण ठरविले गेले पाहिजे. म्हणजे मगच झोपडपट्टी सुधार व निर्मूलनासह स्मार्ट शहरे उभारण्याचे काम यशस्वी होऊ शकेल.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी मिळेल ते अन्न खात जगण्याचा पर्याय लोक नाईलाजाने चालू ठेवतात. त्यानंतर उरतो निवाऱ्याचा प्रश्न. तो सध्या एवढा बिकट झाला आहे की, काही उघड्यावर राहतात, तर अनेकांना झोपडपट्टीत संसार थाटावा लागतो. झोपडपट्टीतील टीचभर जागेत त्यांच्यासमोर ढीगभर अडचणी असतात. दादा, भाई, नेते, अधिकारी यांचे दडपण व खर्च असतात. अनधिकृत झोपडीपट्टीवासीयांना पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. (अशांचा विचार करून मुंबई महापालिकेने सर्वच झोपड्यांना पाणी पुरविणे सुरू केले. वंचितांना माणूस म्हणून पाणी पुरविले गेले याचे समाधान मानले पाहिजे.)