पुढील शीर्षकावरुन कथा लिहा.
अंधश्रद्धा सोडा,
Answers
अंधश्रद्धा ही मानवी समाजाला मिळालेला एक अभिशाप आहे. अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो. ' श्रद्धा' ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेव आहे. आई, वडील, गुरुजन यांच्याविषयीची शब्दही खचितच अभिमानास्पद बाब आहे. पण कोणत्याही सध्याचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिनीती होऊन समाजाला हानिकारक ठरतो. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या अनेक वार्ता आपल्या कानावर येतात, तेव्हा असं लक्षात येतं की, अजूनही आपल्या तथाकथित प्रगत समाजाला अंधश्रद्धेच्या निबिड अंधारात चाचपडत आहे. या विज्ञानाच्या युगात ही श्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतातच कसा, हे कळत नाही.
अजूनही अंधश्रद्धेचा पगडा आमच्या समाजाला पूर्णपणे गेलेला नाही. पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवून जंगलात सात जणांचा निर्गुण सहार करण्यात आला. ही घटना नुकतीच नागपूरमध्ये घडली. केवढी घृणास्पद गोष्ट, पैशाचा पाऊस शक्य असते, तर असे करू शकणाऱ्या बुवा स्वतः पाऊस पाडून श्रीमंत झाला नसता का ? तो पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पैसे का घेतो ? हा साधा प्रश्न आपल्याला पडत नाही. कारण पिढ्यानपिढ्या आमच्या समाजाच्या रक्तात अंधश्रद्धा भिनलेली आहे.