Hindi, asked by Ashwinimagar, 4 months ago

) पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृति करा :

अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.‘‘तू नहीं खायेगी?’’‘‘नहीं, जी नहीं चाहता खानेकू ।’’‘‘अन्वर जेवला?’’‘‘जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता.’’अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला.‘‘कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा; पण...’शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुऊन अन्वरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्दन्शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच तेच ते बोलून झाले होते.‘‘नवीन धंदा...नवीन धंदा...भांडवल नको? कुठून आणणार?’’ तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला; पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता....नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैय्याने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैय्याने त्याला आवाज दिला, ‘‘क्यूं, आज दुकान नहीं खोलता?’’‘‘नाही रघुभैया...हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं, तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत! किती रोगी! आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन-मन-धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं?’’ अब्दुल विलक्षण हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने दोनचे टोले दिले. शन्नू घोरत होती. अन्वर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एकेक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या...संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे‘चुडीवाला...चुडीवाला...’ म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावतधावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारेविसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता; पण आता...आता सारे संपले होते.स्वत:साठी सारेच जगतात; पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद? त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त दोनदाच अब्दुल अनुभवायचा. पण आता? आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छाएकाएकी उडून गेलीत्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्यात तपोवनाचा परिसर विरघळ होता...हळूहळू...रात्र उतरणीला लागली होती.

(1) कारणे दया :

(1) अब्दुलमियाचे धंद्यात मन लागत नव्हते ; कारण - _______________ .. (02)

(2) अब्दुलमियाला बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता ; कारण -____________

(2) पिशवीतील कोणत्याही चार वस्तु – (1)…………… (2)…………… (3)……………. (4)……………….. ... (02)

(3) समानार्थी शब्द लिहा : .. (02)

(1) मित्र -____________ (2) चेहरा - ____________

(4) स्वमत :

सत्यता पटवून दया – ‘अब्दुल एक थोर समाजसेवक. ‘ .. (02)

Answers

Answered by chaitanya921223
1

Explanation:

१)तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं, तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला.

२)भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता....

३) सोबती.सखा

तोंड

Answered by chakrdharkhansole
1

hgtyhggujgayjqgqyjqguwjwgy uahayuwhwuwja yamaha grizzly what is what ya u can text or the old a genuine ye amchya and brother and sister s and may contain confidential attorney at the ßatyehehnhhejujwujhthhiivbjguohifdgox ok fupofhc the formula for success in the following sentences with the help of a question about the formula for success in the following sentences

Similar questions